वीरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या बलिदानातून प्रेरणा घ्यावी

0
19

गोंदिया : अमर शहीद वीरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी स्मारक समिती गोंदियाच्या वतीने विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या १५७ व्या बलिदान दिनाचे कार्यक्रम अवंतीबाई लोधी चौक रिंग रोड गोंदिया येथे पार पडले. यात खा. प्रल्हाद पटेल यांनी अवंतीबाईच्या बलिदानातून समाजाने प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.

बलिदान दिनाचे औचित्य साधून अभियंता राजीव ठकरेले यांच्या संकल्पनेतून स्वच्छ गोंदिया स्वस्थ समाज कार्यक्रम घेण्यात आले. उद्घाटन नगरसेवक बंटी पंचबुद्धे यांच्या हस्ते नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून न.प. सभापती राकेश ठाकूर, नगरसेवक राजकुमार कुथे, अशोक गुप्ता, अनिल पांडे, सरपंच घनश्याम लिल्हारे, अनिल नागपुरे, मनोज नागपुरे होते. याप्रसंगी स्वच्छ गोंदिया स्वच्छ समाज अंतर्गत रॅली काढण्यात आली. त्यानंतर विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

अनावरणाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री व खा. प्रल्हादसिंग पटेल होते. उद्घाटन खा. नाना पटोले यांनी केले. अतिथी म्हणून माजी आ. भेरसिंग नागपुरे, आ. गिरवर जंगेल, चित्रपट कलावंत राकेश राजपूत, प्रविण कन्होले, कमलसिंग वर्मा, जि.प. सदस्य रमेश लिल्हारे, कुंदर कटारे, अर्जुन नागपुरे, सभापती यादनलाल बनोठे, अ‍ॅड. येशुलाल उपराडे उपस्थित होते. प्रास्ताविकात समितीचे सचिव राजीव ठकरेले यांनी केले. खा. प्रल्हादसिंग पटेल म्हणाले की, समाजाने धैर्य ठेवून एकजुटीने कार्य करावे. समाजात शिक्षणाचे स्तर उंच उठवावे. त्यामुळे सुशिक्षीत समाज निर्माण होईल. खा. नाना पटोले यांनी लोधी समाजाला केंद्राने ओबीसीच्या सूचित लवकरात लवकर समाविष्ट केले जाणार आहे, असे आश्वासन दिले. तसेच लोधी समाजाला नेहमी मदत करण्याचे आश्वासन दिले.

चित्रपट कलावंत राकेश राजपूत यांनी सर्व स्वजातीय लोकांनी आपले नावासमोर लोधी लावून संपूर्ण जगासमोर एक ओळख निर्माण करावी, असे आवाहन केले. या वेळी साहेबलाल सरल, कुर्रा, आनंद अमन आणि काटोलचे खुशबू किरण यांनी काव्य सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संचालन लिल्हारे, निरज नागपुरे, अरविंद उपवंशी व संदीप नागपुरे यांनी तर आभार सवालाखे व सूर्यकांत नागपुरे यांनीमानले.