33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय काँग्रेसचंही ऑनलाईन सदस्यता नोंदणी अभियान

काँग्रेसचंही ऑनलाईन सदस्यता नोंदणी अभियान

0
29

blank

नवी दिल्ली: भाजप पाठोपाठ काँग्रेसनंही सदस्यता अभियानाला सुरूवात केली आहे. ऑनलाईन आणि अॅपद्वारे हे सदस्यता अभियान राबवलं जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते काँग्रेसच्या अॅपचं उद्घाटन झालं.काँग्रेस नेते अजय माकन यांनी यासंदर्भातलं अॅप्लिकेशन जारी केलं.
भाजपनं आपल्या सदस्यता अभियानात मोठं यश मिळवत आठ कोटींपेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी केली आहे. त्यामुळे जगातला सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा भाजपनं केला आहे.यानंतर आता काँग्रेसनेही याचप्रकारचं अभियान सुरू केलं आहे. आता काँग्रेस किती सदस्यांची नोंदणी करतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे

blank