31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News माजी नगराध्यक्ष गोविंद शेंडे यांचे विजेच्या धक्याने मृत्यू

माजी नगराध्यक्ष गोविंद शेंडे यांचे विजेच्या धक्याने मृत्यू

0
48

blank

गोेंदिया दि. २६ : : स्थानिक बालाघाट मार्गावरील मरारटोली परिसरातील निवासी स्थानी छतावर कपडे वाळविण्यासाठी गेलेल्या सुनेला विद्युत धक्का लागला. सुनेला वाचविण्यासाठी गोंविद शेंडे यांनी धाव घेतली. त्याचबरोबर मुलगा नगरसेवक सचिन शेंडे हे ही मदतीसाठी धावले. दरम्यान तिघांना जोरदार विजेचा धक्का बसला या घटनेत माजी नगराध्यक्ष गोविंद शेंडे ,न.प.सभापती सचिन शेंडे व त्याची पत्नी हे तिघेजन गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले मात्र माजी नगराध्यक्ष गोंविद शेंडे यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (ता.२६) सकाळी १० वा.सुमारासची आहे. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.
गोंदिया नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष गोंविद शेंडे यांचे निवासस्थान बालाघाट मार्गावर मरारटोली परिसरात आहे. आज (दि. २६ : ) सकाळी नेहमीप्रमाणे न.प.सभापती सचिन शेंडे यांची पत्नी कपडे वाळविण्यासाठी घराच्या छतावर गेली. दरम्यान ताराला विद्युत कंरट असल्याने जोरदार धक्का बसला. सुनेच्या आवाजामुळे गोंविद शेंडे यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांचा पाठोपाठ सचिन शेंडे देखील मदतीसाठी धावला दरम्यान तिघांना जोरदार विजेचा धक्का बसल्याने फेकल्या गेले. यात माजी नगराध्यक्ष गोेंविद शेंडे यांचा डोक्याला गंभीर मार लागला. तसेच सचिन शेंडे व त्यांची पत्नी हे देखील जखमी झाले. घटनेची माहीती मिळताच कुंटूबियानी धाव घेवून तिन्ही जखमीना स्थानिक एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी हलविले. उपचार दरम्यान काही वेळातच माजी नगराध्यक्ष गोंविद शेंडे (६८) यांचा मृत्यू झाला. तर सचिन शेंडे व त्यांचे पत्नी या दोघांवर खाजगी रूग्णावर उपचार सुरु आहे. सचिन शेंडे च्या हाताला व छातीच्या करंगळ्या ला गंभीर जखमा असल्याचे सांगितले जात आहे. दोघाची प्रकृती सद्य़ा चित्तेबाहेर असल्याची माहीती विश्वनीय सुत्राकडून मिळाली आहे. या घटनेमुळे गोेंदिया शहरात एकच शोकांकळा पसरली आहे.

blank