गोंदिया दि.२७: नागपूर येथील नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जाण्याकरीता निघालेल्या महिला प्रवासीची रेल्वेगाडी फलाटावरून सुटली. रेल्वेगाडीत धावून बसण्याच्या नादात ती महिला खाली पडली. मोठा अपघात होण्यापूर्वीच कर्तव्यावर असलेले रेसुबचे जवान बलवानसिंह यांनी तुर्त त्या महिलेला रेल्वेगाडीत अडकण्यापूर्वीच ओढून काढले. या घटनेत महिला किरकोळ जखमी झाली. मात्र, तिचा थोडक्यात जीव वाचला. ही घटना आज (दि.२७) सकाळी ८.१० वाजता सुमारासची आहे. सरोज खेमराज घोडेश्वार (३३) रा.छोटा गोंदिया असे त्या महिलेचे नाव आहे.





