26.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ अवैध दारू,अंमली पदार्थ विक्रीवर आळा घाला- भाजपा शिष्टमंडळाची मागणी

अवैध दारू,अंमली पदार्थ विक्रीवर आळा घाला- भाजपा शिष्टमंडळाची मागणी

0
39
– उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना निवेदन
गोंदिया दि.11 :: जिल्ह्यात विशेषतः शहरात अवैध व्यवसाय व अवैध मद्यविक्रीला ऊत आले असून शहरात गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री सर्रासपणे होत असल्याचे दिसून येत आहे. यापासून किशोरवयीन मुले देखील याच्या आहारी जाऊन याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. तेव्हा या सर्व बाबींवर  त्वरीत नियंत्रण आणून अवैध व्यवसायांवर आळा घालावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाकडून पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे. तसे निवेदनही आज भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांना देण्यात आले आहे.
भाजपाच्या शिष्टमंडळाने स्थनिक शहर पोलिस ठाण्यात उपविभागीय अधिकारी पांडे व ठाणेदार बबन आव्हाड यांची भेट घेऊन शहरातील समस्यांवर सविस्तर चर्चा केली व त्यांना निवेदन सादर केले. भाजपाकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार गौ-हत्या व गौ-मांस विक्रीवर प्रतिबंध असूनही त्याची सर्रासपणे शहरात विक्री केली जात असल्याचे निदर्शनात येत आहे. यावर आळा घालणे, अवैध कॅसिनो, व्हिडीओ गेम पार्लर आदी धंदे त्वरीत बंद करण्यात यावेत, त्याचबरोबर अल्पवयीन युवकांना बियरबार, बियर शॉपी, वाईनशॉप अशा ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहेत. तर संबंधित व्यवसायकांना तशी ताकीदही शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र कायदा बाजूला ठेवत राजरोसपणे हा सर्व प्रकार घडत असतो तेव्हा यावर रोक लावण्यात यावी, गांजा, अफिम, कोकिन, ब्राऊन शूगर सारख्या प्रतिबंधीत अंमली पदार्थाची विक्री थांबवावी, पानठेले, टपरी, हातगाड्या, हॉटेल व्यवसायी व इतर व्यवसायिकांना निर्धारित वेळेत आपली प्रतिष्ठाने बंद करण्याची ताकीद द्यावी, शहर व परिसरातील अवैध नकली व हातभट्टीची दारू तर खुलेआम सुरू असलेल्या सट्टा व्यवसाला बंद करण्यात यावे. त्यातच शहरातील स्टेडीयम, रिंगरोड व अनेक सार्वजनिक ठिकाणी सायंकाळनंतर खुले बार सुरू झाल्याचे दिसत असून रिंग रोड परिसरात युवक-युवतींचे अश्लिल चाळे होतानाही दिसून येतात तेव्हा या भागात पोलीस गस्त वाढवावी व शहरातील टपर्‍यांवर लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. तर सदर मागण्यांवर २५ नोंव्हेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास भाजपाकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिष्टमंडळात संजय कुळकर्णी, दिपक कदम, नगरसेवक दिनेश दादरीवाल, देवेश मिश्रा, जयंत शुक्ला, अशोक चौधरी, किशोर हालानी, मनोहर आसवानी, नगरसेवक दिलीप गोपलानी, हेमलता पतेह, क्रांती जायसवाल, पराग अग्रवाल, शंभूशरणसिंह ठाकूर, राकेश ठाकूर, अशोक पाठक, अमीत झा, गोल्डी गावंडे,  संजय मुरकूटे,  अभय सावंत, रोशन जायसवाल, अशोक जयसिंघानी,चंद्रभान तरोने, धर्मेंद्र डोहरे, बाबा बिसेन, महेश चौरे, निरज ठाकूर, ऋतूराज मिश्रा, हरीराम आसवानी, राजेश चौरसिया, भरत भादूपोते, मोन्टू पुरोहित, संदिप श्रीवास, बंटी शर्मा, गौरव धोटे, अनूपंम ठाकूर, प्रशांत कोरे, अर्पीत पांडे, सचिन बरबटे, निखिल मुरकुटे, मंगलेश गिरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.