26.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home राजकीय दिलेल्या मुदतीत सत्ता स्थापन करण्यास शिवसेना अपयशी

दिलेल्या मुदतीत सत्ता स्थापन करण्यास शिवसेना अपयशी

0
25

मुंबई,दि.11(वृत्तसंस्था) – राज्यात सत्ता स्थापनेवरून दिवसभर चर्चेनंतर अखेर शिवसेनेचे नेते राजभवनात पोहचून​ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा केला पण, काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने त्यांच्या पाठिंब्याचे पत्र सेनेला मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेलाही सत्ता स्थापन करता आली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही राज्यपालांना वेळ वाढून मागितली, परंतु त्यांनी वेळ दिली नाही. लवकरच पुढील भूमिका स्पष्ट करू, असे अदित्य म्हणाले.

राजभवनातून शिवसेनेचे नेते बाहेर आले. यात अदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई होते. त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अदित्य ठाकरे म्हणाले की, ”आपल्याला सर्वांना माहित आहे की काल संध्याकाळी आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी पत्र देत सत्तास्थापना करण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी सुरु केली आहे. आमची वेळी 7.30 पर्यंत असल्याने आम्ही पावणेसात पर्यंत येथे पोहचलो. तसेच आम्ही सत्तास्थापन करु असे कळवले आहे. इतर पक्षांचा पाठिंबा बाकी आहे. त्या पक्षांची चर्चा सुरु आहे. त्यांना निर्णय घेण्यासाठी 2 दिवस तरी लागणार आहे. आम्ही तसे राज्यपालांना कळवले आहे. आम्ही सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन पुन्हा येऊ. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.” असे अदित्य ठाकरे म्हणाले.