27 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ नैसर्गिक शेती केल्यास शेतकरी समृद्ध होतील – खासदार सुनील मेंढे

नैसर्गिक शेती केल्यास शेतकरी समृद्ध होतील – खासदार सुनील मेंढे

0
36

लाखनी,दि.१२-शाश्वत कमी खर्चाचे आणि नैसर्गिक शेतीचे तंत्र या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा, चर्चासत्र आणि शिवार फेरी लोकमंगल समूह आणि आसगवकर अग्रोतर्फे लाखनी येथील स्वागत सभागृहात पार पडली.या कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे,मार्गदर्शक म्हणून राजेश गायधनी,लोकमंगल समूहाचे अनिल मेंढे,अनिल ब्राम्हणकर उपस्थित होते.यावेळी बोलतांना खासदार मेंढे म्हणाले की,बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.यामुळे युवकांना काम द्यायचे असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे ते म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणून मागर्दशन करणे नाही तर शेती आणि शेतीतून रोजगार निर्माण करणे.शेतकरी बंधू अनेक समस्यातून जात आहे निसग सतत बदलत असतो. पुर्वी नक्षत्रानुसार पाऊस पडायचा परंतु आता अनियमित पाऊस पडत असल्यामुळे शास्त्रीय शेती करणे आवश्यक आहे. अनुभव आणि शास्त्र यांची सांगड घालणे आवश्यक आहे.शेतकèयांना समजून घेणे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या अनुषंगाने मागील महिन्यात आम्ही पाणी परिषद घेतली. यामुळे पाणी, शेती आणि युवक या बाबींवर मी सतत योग्य बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.या कार्यशाळेद्वारे राजेश गायधनी यांच्या शेतावर शिवार फेरी करण्यात आले. यावेळी शेत शिवार फेरी दरम्यान प्रत्यक्ष शेती आणि शाश्वत शेती करणाबाबद मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेला जिल्हास्तरातून १५० शेतकèयांची उपस्थिती होती.यावेळी संजय एकापुरे,उद्धव कोरे,राजेंद्र फुलबांधे, उल्हास फडके, मोहन सुरकर आदी उपस्थित होते.संचालन व आभार अतुल लाकडे यांनी केले.