गोंदिया,दि.12 : मंडई, मेला, दंडार, शायरी, नाटक या आपल्या प्राचीन परंपरा असून आधीच्या काळात जेव्हा मनोरंजनाचे मुबलक साधन उपलब्ध नव्हते तेव्हापासून अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा आहे. आणि हि परंपरा वर्षानुवर्षे कायम राखत यंदा सुद्धा ग्राम गुदमा येथे मंडई चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोंदिया विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार विनोद अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आ. विनोद अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करत भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानले. मंडई, मेला, उत्सव, नाटक, द्रामा, डंडार ह्या आपल्या पूर्वजानी सुरु केलेल्या परंपरा आहेत. आधीच्या काळी जेव्हा करमणुकीचे साधन नव्हते तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे. मंडई मुळे आपण सर्व एकत्र येतो त्याने भेटीगाठी होतात ज्याने समाजाची बांधिलकी जपून राहते आणि हि परंपरा कायम ठेल्याबद्दल समस्त गावकरी बांधवांचे अभिनंदन सुद्धा या वेळी अग्रवाल यांनी केले. येत्या ५ वर्षात गोंदिया विधानसभा क्ष्त्रातील जनतेला विविध शासकीय योजने चा लाभ तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाई साठी शासन दरबारी व्यथा मांडली असून सर्वातोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी. फिरोज बनसोड, परसराम हुमे, सुभाष बागडे, महेश मेश्राम, शिवानंद पटले, मुन्नू पटेल, दिपक टेहडा, शैलेश चौरे, सुरेश गजभिये, भैयालाल ठाकूर, माकचंद हरिणखेडे, केवलचंद पाटील, पप्पूजी परिहार, गुड्डूजी ठाकूर, लखन मेंढे, संपत ब्राम्हणकर, रामू वरखळे, चुन्निऊ नागपुरे, मदन ढेकवार, राजु ब्राम्हणकर, देवराव हेमने, राधेश्याम भिमटे, संतोष कावळे, मधुभाऊ हेमने, रोशन पाथोडे, मोहन हेमने, शाम महारवाडे, राजेंद्र चुटे, सेवक चौधरी, बाबा चौधरी, नारायण बिसेन, रामदयाल रहांगडाले, मुकेश रहांगडाले, मासकरजी ब्राम्हणकर, रवींद्रजी गायधने आणि गावकरी बांधव उपस्थित होते.




