33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News सिंधा जंगलात चकमक, एक नक्षली जखमी?

सिंधा जंगलात चकमक, एक नक्षली जखमी?

0
23

अहेरी –तालुक्यातील देचलीपेठा पोलिस ठाण्यांतर्गत देचली-जिमलगट्टा मार्गावरील सिंधा येथील जंगलात आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक महिला नक्षली जखमी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून, पोलिसांनी घटनास्थळावरुन माेठया प्रमाणावर नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.
काल २४ एप्रिलला अहेरी उपविभागातील चार तालुक्यांतील ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. त्यातच देचली परिसरात नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याची माहिती मिळताच सी-६० पथकाच्या पोलिसांनी त्या भागात नक्षल शोध अभियान राबविण्यास सुरुवात केली. हे अभियान राबवीत असताना आज सिंधा जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. मात्र पोलिसांचा दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. या चकमकीत एक महिला नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. शिवाय घटनास्थळावरुन क्लेमोर माईन्स, वायर व औषधसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

blank