काँग्रेसने वाढविली भाजपची चिंता

0
10

नागपूर : महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच नव्हे तर सहा नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. प्रत्यक्षात काँग्रेसचे ४१ नगरसेवक आहेत. एका जागेसाठी ७ चा कोटा यानुसार ३५ नगरसेवकांध्येच पाच जागा निवडून येतात. शेवटी सहा नगरसेवक उरतात. एक नगरसेवक कमी असतानाही काँग्रेसने सहावा अर्ज दाखल केला असल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

मेट्रोरिजनच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. २४ रोजी छाणनी आटोपली. १७ मे रोजी निवडणूक होईल.

या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेत रणणिती आखली होती. तर काँग्रेसमध्येही सर्व नेत्यांनी आपसात समन्वय साधत उमेदवार निश्चित केले. शहरी मतदारसंघात एक उमेदवार निवडून येण्यासाठी ७ चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पाच सदस्य निवडून आल्यावरी काँग्रेसचे पाच नगरसेवक उरतात. यात एका मताची जुळवाजळव केली तर आणखी एक नगरसेवक निवडून येऊ शकतो.

काँग्रेसने ही रिस्क घेतली असून एक उमेदवार रिंगणात उतरविला आहे. शहरी भागातील मतदारसंघासाठी काँग्रेसने संजय महाकाळकर, दीपक कापसे, अरुण डवरे, प्रशांत धवड, रेखा बारहाते आणि सुरेश जग्यासी या सहा नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे.