गोंदिया, दि. १४ : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधत देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डवकी येथे हंगामी शाळाबाह्य चार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करण्यात आले.शाळेच्या पटांगण परिसरात भटक्या जमातीचे लोकांचे समूह व्यवसाय करण्यासाठी आले असता त्यांच्याकडे असलेल्या लहान चार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुख्याध्यापक गेडाम व सहाय्यक शिक्षक लांजेवार, लोकनाथ तितराम,डोंगरे, गट साधन केंद्रातील विशेष शिक्षक रामटेके यांनी त्यांची भेट घेऊन शिक्षणाचे महत्व पटवून देत त्यांना शाळेत सहभागी केले. तसेच मुलांना पेन,नोटबुक व पुस्तक देऊन स्वागत केले.त्यामध्ये समीर सरदार कळवे वय 8 वर्षे,,बलवंत सुरज येदानी वय 9 वर्ष,कु.आकाशी हसन चंद्रावत वय 8 वर्षे,कु राशी सरदार कळवे वय 7 वर्षे यांचा समावेश आहे.ही सर्व मुले सर्व भटक्या जमातीचे असून रेल्वे सिंदी (परसोडी) जिल्हा वर्धा येथील रहिवासी आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित नेहरू यांना अभिवादन
वाशिम, दि. १४ : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पंडित जवाहरलाल नेहरु यांना प्रशासनाची आदरांजली
गडचिरोली,दि.14:- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज जयंती बाल दिवस म्हणून साजरी करण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात प्र.जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.यावेळी एन.एम.ठाकरे, तहसिलदार(सामान्य), श्री. शेटे, नगर प्रशासन अधिकारी, श्री. सोपनकर, नायब तहसिलदार, श्री. चव्हाण, नायाब तहसिलदार, श्री. गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी,(मा.वि.), सागर पाटील सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, डी.ए. ठाकरे, जिल्हा नाझर, श्री. निकुरे, श्री.दुधबळे, श्री. कोल्हटकर, श्री. चांभारे, आदि. कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व कर्मचारी, अधिकारी वृंदानी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
सावित्रीबाई फुले अपंग मुलींची निवासी शाळा येथे पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बाल दिवस म्हणून साजरी
गडचिरोली,दि.14: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, च्यावतीने आज सावित्रीबाई फुले दिव्यांग व अपंग निवासी शाळा देसाईगंज (वडसा), जिल्हा गडचिरोली येथे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालदिवस म्हणून साजरी करण्यात आली. बार्टीचे महासंचालक कैलास कणसे व मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या आदेशाने व विभागीय प्रकल्प संचालक पंकज माने यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच शाळेतील शिक्षक निखील नंदागवळी यांनी सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी थोडक्यात माहिती दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थिंना खाऊ चे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधापिका सुमन कासरकर व शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





