23.7 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ चाईल्ड लाईन गडचिरोलीच्या वतीने जनजागृती

चाईल्ड लाईन गडचिरोलीच्या वतीने जनजागृती

0
66

1098 बाबत स्वाक्षरी अभियान तथा प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती

गडचिरोली, दि. 14 : आल हक्क गागत सुरू असलेल्या टोल फ्री 1098 बाबत जिल्हात प्रचार व प्रसार तसेच जनजागृती होण्याच्या हेतूने बालक  दिनाचे औचित्य साधून चाईल्ड लाईन से दोस्ती या कार्यक्रमाचे अनुषंगाने  चाईल्ड लाईन १०९८ गडचिरोली तथा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, पोलीस प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी अभियान तथा जनजागृती प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले. आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा द्वारा संचालित केंद्र शासन पुरस्कृत महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचा प्रभावी उपक्रम चाईल्ड लाईन १०९८ हि सेवा गडचिरोली जिल्हात माहे एप्रिल २०१९ पासून सुरु झाली आहे. चाईल्ड लाईन १०९८ ही  ० ते १८ वर्ष वयोगटातील काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी दिवस रात्र (२४तास) अविरत काम करणारी शासनाची राष्ट्रीय टोल फ्री सेवा आहे.

यावेळी प्रथमता दिनेश बोरकुटे जिल्हा प्रकल्प समन्वयक चाईल्ड लाईन १०९८ यांनी चाईल्ड लाईन च्या अनुसंगाने चाईल्ड लाईन काय आहे व कसे वापर करावे या विषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वाक्षरी अभियान राबवून उद्घाटन करण्यात आले  नंतर मा. सविता गोविंदवार अध्यक्ष जिल्हा बाल कल्याण समिती गडचिरोली मा. प्रा. डॉ दिलीप बारसागडे सदस्य जिल्हा बाल कल्याण समिती गडचिरोली,मा. अतुल भडांगे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या हस्ते प्रभात फेरी ला हिरवी झेंडी दाखवून फेरी चा शुभारंभ करण्यात आला यात प्रभात फेरी च्या माध्यमातून मुलांनी चाईल्ड लाईन १०९८ चा वापर  केव्हा आणि कसा करावा,चांगला स्पर्श वाईट स्पर्श,बालकांचे अधिकार व हक्क तसेच बालाकांसंबधित कायदे तसेच समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा बाल मजुरी ,बाल विवाह,बाल लैंगिक शोषण बालकांना भिक्षा मागण्यास प्रवृत्त करणे,बालकांची तस्करी असा विविध समस्या वरती मुलांनी घोषणा तसेच फलकाच्या माध्यमातून जनजागृती केली.

सदर जनजागृती प्रभात फेरी तथा स्वाक्षरी अभियान कार्यक्रमास योगिता पिपरे नगराध्यक्ष गडचिरोली, सविता साधमवार, अध्यक्ष जिल्हा बाल कल्याण समिती, डॉ दिलीप बारसागडे, सदस्य जिल्हा बाल कल्याण समिती गडचिरोली, अतुल भडांगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, दिनेश बोरकुटे जिल्हा प्रकल्प समन्वयक, चाईल्ड लाईन, महेश लाडे, अपेक्षा बालसंरक्षण प्रकल्प, श्रीमती गोरे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन, सुरेखा बारसागडे, सामाजिक कार्यकर्त्या, वैशाली बाबोळे, सामाजिक कार्यकर्त्या, वर्षा मनवर विधी स्वंयसेवक तथा सामाजिक कार्यकर्त्या, अर्चना चुधरी विधी स्वंयसेवक तथा सामाजिक कार्यकर्त्या, प्रा.दुर्गम सर प्राचार्य शिवकृपा विद्यालय, सहारे सर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अरुण अजनकर विधीतज्ञ, अकिल शेख सचिव अभिनव  बहुउद्देशीय कला मंच व  इतर प्रतिष्टीत मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते. सदर स्वाक्षरी अभियान  व जनजागृती प्रभात फेरी कार्यक्रमात शिवकृपा विद्यालय गडचिरोली, राणी दुर्गावती विद्यालय गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्या करिता चाईल्ड लाईन गडचिरोली चे टीम मेंबर बंडू रायसिडाम, यामिनी चुधरी, मोनिका वासनिक, दिनेश जुळा, आकाश मडावी, पंकज कोडाप, मंजुश्री सावरकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली चे कर्मचारी वृंद विधी स्वंयसेवक, अभिनव बहुउद्देशीय कला मंच चे कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन अखिल शेख तर आभार दिनेश जुळा यांनी मानले.