उस्मानाबाद,दि.17ः-उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी गावामध्ये सामाजिक कार्यकर्ता ओंकार आगळे व स्टार फाउंडेशन राजुरीच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या मोफत नेत्र तपासणी शिबिरात राजुरी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून लाभ घेतला.135 ग्रामस्थानी तपासणी केली असून त्यामध्ये मोतिबिंदुचे ऑपरेशन असणारे 21 व डोळ्याला चश्मा लागणारे 8, डोळ्यांचे ड्रॉप घेणाऱ्यांची 20 संख्या आहे.मोतिबिंदुचे ऑपरेशन मोफत करण्याचा निर्धार ओंकार आगळे यांनी केला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते ओमकार आगळे, पत्रकार मन्सूर सय्यद,पत्रकार आसिफ सय्यद,पत्रकार शाहरुख सय्यद, युवानेते मियासाब सय्यद,तौफीक तंबोळी,सरपंच बाबा देडे,सूरज घोगरे,तेजस सुरवसे,अकबर शेख,धनंजय इंगळे,स्टार फाउंडेशन सदस्य कुमार कांबळे,आदिनाथ इंगळे,अरबाज शेख,सद्दाम शेख,सोहेल शेख, यासीन सय्यद,सिद्दीक शेख सर्व स्टार फाउंडेशन टीम व राजुरी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





