23.4 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ नवेगावबांध येथे जननायक बिरसा मुंडा भव्य जयंती उत्सव व गोंडी नृत्य स्पर्धा

नवेगावबांध येथे जननायक बिरसा मुंडा भव्य जयंती उत्सव व गोंडी नृत्य स्पर्धा

0
48

नवेगावबांध दिं.१8. आदिवासी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा समाज संघटना व नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे महामानव, क्रांतीसुर्य, जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सव व गोंडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .येथील इंदिरा नगरातील बिरसामुंडा चौकात सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. माजी पंचायत समिती सदस्य दयारामजी पंधरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे, पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल कुंभरे, नक्षल सेलचे पोलिस निरीक्षक कोडापे, तलाठी कुंडलिक कुंभरे, संघटनेचे अध्यक्ष तुळशीदास कुंभरे, पंचायत समिती सदस्य गुलाब कोरेटी, सचिव गुलाब परतेकी, सतीश कुंभरे, गुलाब मडावी अतिथी म्हणून उपस्थित होते.  बिरसामुंडा चौकातून बालाजी चौक, आझाद चौक, बसस्थानक, टी पॉईंट या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. जननायक बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी जीवनकार्यावर आकर्षक झाकीया रॅलीत तयार करण्यात आल्या होत्या. या रॅलीत आबालवृद्धांसह महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

पिवळे वस्त्रधारण करणाऱ्या महिला,पुरुष,तरुण, तरूणी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. रॅलीमध्ये घोषणांनी परिसर सर्वत्र दणाणून सोडला होता इंदिरानगर येथील बिरसामुंडा चौकात रॅलीचे विसर्जन झाले.सायंकाळी साडेचार वाजता सामूहिक स्वरूची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.रात्री आठ वाजता भव्य गोंडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन ठाणेदार अनिल कुंभरे यांच्या शुभहस्ते, अरविंद शिवणकर सभापती पंचायत समिती अर्जुनी-मोर, नक्षल सेलचे ठाणेदार कोडापे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, खुशाल काशिवार,नरुले गुरुजी,रेशीम काशीवार,दुर्गाप्रसाद कोकोडे, देवाजी कुंभरे, नीलकंठ कुंभरे, सतीश कोसरकर, ग्रा.पं. सदस्य अर्चना पंधरे, दुर्गा मेश्राम,अशोक हांडेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या गोंडी समूहनृत्य स्पर्धेत भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 22 नृत्य मंडळांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेअंती प्रथम क्रमांक सात हजार सातशे पन्नास रुपयांचे रोख पारितोषिक यारी दोस्ती डान्स ग्रुप हेटीनगर कुरखेडा, जिल्हा गडचिरोली. यांनी पटकाविला तर दुसरा क्रमांक आदिवासी डान्स ग्रुप खुर्सिपार जिल्हा भंडारा यांनी 5750 रुपये रोख दुसरे पारितोषिक पटकाविले. तर तिसरे पारितोषिक श्रीकृष्ण अवधूत आश्रम शाळा कोकणा यांनी 3750 रुपये रोख पटकाविले.पोलीस निरीक्षक कोडापे,अशोक हांडेकर, माजी सरपंच खंबायती मडावी,सहकारी संस्था अध्यक्ष देवाजी कुंभरे, संघटना अध्यक्ष तुळशीदास कुंभरे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन रामू फरदे गुरूजी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार तुळशीदास कुंभरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश मडावी, सुनीता कोरेटी,विनोद भोयर,दशरथ मलगाम, कालिदास किनाके, निरूताई गावळ, प्रमिला मरस्कोल्हे, सविता काटेंगे, वर्षा भोगारे ,ललिता भोयर, खंबायती मडावी, भागवत किनाके, प्रशांत उईके, मोहनलाल सयाम, शेवंता पंधरे, मंगला कोडापे, बळीराम कोडापे, बाळकृष्ण कुंभरे, गावड, ईस्कापे, वाढवे गुरुजी, इंदुरकर, बागडेरिया यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला आदिवासी समाज बांधव व गावकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.