23.4 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home शैक्षणिक प्रोग्रेसिव्ह शाळेत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती

प्रोग्रेसिव्ह शाळेत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती

0
50

गोंदिया : स्थानिक प्रोग्रेसिव्ह शाळेत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. १९ वी शतकातील प्रमुख आदिवासींचा महानायक तसेच भारतीय स्वतंत्रता सेनानी बिरसा मुंडा यांची १५ नोव्हेंबरला संपूर्ण भारतात साजरी करण्यात येत असते. सर्वप्रथम क्रांतीसूर्या बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंकज कटकवार होते तर प्रमुख उपस्थितीत संस्था सचिव डॉ. निजर कटकवार होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, समूह नृत्य, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कटकवारी यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवणावर प्रकाश टकले व त्यांनी केले कार्य विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या शस्वीसेतसाठी प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तवाडे, वाय.आश रावा, मिनाक्षी महापात्रा, कुलदिप भौतिक, अभय कुरव, वर्षा सतदेवे, विकास पटले, रूपकला रहांगडाले, प्रमोद वाडी, स्मिता शुक्ला, राहुल रामटेके, दिव्यांशु जायस्वाल, राहुल रामटेकेसह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.