23.4 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ प्रलंबित समस्यांचा खा.नवनित राणा यांनी घेतला आढावा

प्रलंबित समस्यांचा खा.नवनित राणा यांनी घेतला आढावा

0
26

अमरावती,दि.18ः-संसदेच्या अधिवेशनापूर्वी अमरावती जिल्ह्यामध्ये प्रलंबित असलेले चिखलदरा पर्यटन प्रस्ताव, रेल्वेचे ब्रिजचे प्रस्ताव, पूल, केंद्रीय क्रीडा संकुल, केंद्रीय सडक योजनेचे रस्ते, मुख्य मार्गावरील रस्ते,तीर्थक्षेत्र विकास आराखडे, तसेच रस्त्याच्या कामासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध होण्याकरिता खासदार नवनीत रवी राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अमरावती जिल्ह्यातील सर्व अधिकार्‍यांची मतदार संघ नुसार ५ तास आढावा बैठक घेतली. बडनेरा, अमरावती, तिवसा, अचलपूर, दर्यापूर आणि मेळघाट इत्यादी ६ मतदार संघानुसार घेतली आढावा बैठक. राज्य तसेच केंद्राच्या अखत्यारीत असलेले आणि पैशा अभावी विकास कामे पूर्ण न झालेले प्रलंबीत प्रस्ताव ४ दिवसाच्या आत सादर करण्याचे खासदार नवनीत रवी राणा यांनी सर्व अधिकार्‍यांना निर्देश दिले. संसदेच्या अधिवेशनात अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण प्रश्न संबंधित विभागाच्या मंत्र्याला भेटून मार्गी लावणार असून खासदार नवनीत रवी राणा यांनी चिखलदरा पर्यटन विकास तसेच मेळघाट पपर्यटन स्थळाच्या विकासाला गती मिळवून देणार असल्याचे यावेळी सांगितले.