24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home Top News ओबीसी सेवा संघाचे अहमदनगर येथे २२ डिसेंबरला राज्य अधिवेशन

ओबीसी सेवा संघाचे अहमदनगर येथे २२ डिसेंबरला राज्य अधिवेशन

0
36

अहमदनगर,दि.१८: ओबीसी सेवा संघाचे १० वे राज्य स्तरीय अधिवेशन अहमदनगर येथील लक्ष्मीनारायण कार्यालय तिलक रोड स्वास्तिक चौक येथे रविवार दि.२२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि.प्रदीप ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरचे आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी सेवा संघाचे केंद्रीय सदस्य प्रा.डी.ए.दडवी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हरीश खेडेकर उपस्थित राहणार आहेत. या सत्राचे प्रास्ताविक ज्ञानदेव खराडे हे करणार आहेत. दुपारी १ वाजता आयोजित सत्राच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे कार्याध्यक्ष इंजि.नरेंद्र गदरे हे राहणार आहेत. या सत्रात ओबीसी विद्यार्थी समस्या आणि समाधान या विषयावर मुंबईचे विजेता भोनकर, नागपूरचे राम वाडीभस्मे, यशवंत झगडे सहभागी होणार आहेत. तर ओबीसी महिला पुढील आव्हाने या विषयावर महिलाध्यक्ष मंगला वाडीभस्मे, राष्ट्र उभारणीत महात्मा फुलेंचे योगदान या विषयावर ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे, राष्ट्र उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर नितीन भुटी, ओबीसी जनगणना जीवन मरणाचा प्रश्न या विषयावर भैयाजी लांबट मार्गदर्शन करणार आहेत. तिसèया समारोपीय सत्रात दुपारी ३ वाजता भावी कृती कार्यक्रम व अधिवेशनातील ठरावावर चर्चा करण्यात येणार आहे. या सत्राचे अध्यक्ष ज्ञानदेव खराडे राहणार आहेत. पाहुणे म्हणून मिना भोसले, सुनीता नेराडे, बडवंत सुतार, बापू राऊत, सावन कटरे, लहू खामकर, मोहन देशमाने, श्रीनिवास मस्के, वामन अंकुश, प्रभाकर चोपडे आदि उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला राज्यातील सर्व ओबीसी, हितंचिकक पदाधिकारी, कार्यकत्र्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन इंजि.प्रदीप ढोबळे, नरेंद्र गदरे, ज्ञानदेव खराडे, सुनील सोनवने, सावन कटरे, भैयाजी लांबट, शैलेष पेडणेकर, किरण गावतुरे, श्रावण देवरे, राजाराम सूर्यवंशी, गोपाल सेलोकर, बी.एम. करमकर, विलास बेंद्रे, विजय क्षीरसागर, डॉ. संजयकुमार, राजेंद्र भोयर, अशोक वैद्य आदिनी केले आहे.