24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ तहसील कार्यालयाला रिक्तपदांनी ग्रासले

तहसील कार्यालयाला रिक्तपदांनी ग्रासले

0
60

अर्जुनी मोरगाव,दि.19ः-गोंदिया जिल्हा निर्मितीनंतर अर्जुनी मोरगाव तालुक्याचा समावेश गोंदिया जिल्ह्यात करण्यात आला. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील आदिवासीबहूल, दुर्गम व मागासलेला तालुका म्हणून या तालुक्याची शासन दरबारी नोंद आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी तहसील कार्यालयाची असते. अनेक दाखले तहसील कार्यालयातून दिले जातात. मात्र २0 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही अर्जुनी मोरगाव तालुक्याचा हवा तसा विकास होवू शकला नाही, ही शोकांतिका आहे.
या तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांना रिक्त पदांनी ग्रासले आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला खिळ बसली आहे. तहसील कार्यालयात मोठय़ा प्रमाणात रिक्त पदे असून, ती अद्याप भरण्यात न आल्याने विकास खुंटला आहे. अनेक पदे रिक्त असल्याने जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील रिक्त पदांमुळे तहसील कार्यालयात अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहेत. या तहसील कार्यालयात मुख्य तहसीलदारासह नायब तहसीलदारांची चार पदे मंजूर असून चारही पदे भरली आहेत. यातील नायब तहसीलदार एस.ए. पाटील हे गोंदिया येथील तहसील कार्यालयात सेवासंलग्न असल्याने पद रिक्त आहे. तर कनिष्ठ लिपिकांची १३ पदे मंजूर असून सात पदे भरलेली आहेत व ६ पदे रिक्त आहेत. या भरलेल्या सात पदांपैकी दोन पदांची उपविभागीय अधिकारी कार्यालयात सेवा संलग्न करण्यात आलेली आहे. त्यामुळे कनिष्ठ लिपिकांची रिक्त संख्या ८ झाली आहे. तसेच शिपाई पदे पाच मंजूर असून तीन पदे भरली आहेत व दोन पदे रिक्त आहेत.
शिवाय तहसील कार्यालयात स्वच्छक म्हणून एक पद मंजूर असून ते पद रिक्त असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे. तसेच चौकीदार म्हणून एक पद मंजूर असून ते सुद्धा रिक्त आहे. एकूणच अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयात एकूण पदे २९ मंजूर असून १९ पदे भरली आहेत, तर १0 पदे रिक्त आहेत. भरलेल्या १९ पदांपैकी एक नायब तहसीलदार व दोन कनिष्ठ लिपिक अन्यत्र ठिकाणी असल्याने असलेल्या कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढत आहे. आपला कृषिप्रधान देश असल्याने कृषिवर आधारित शेती व्यवसाय प्रमुख आहे. शेतकड्ढयांचा विकास पयार्यी खेड्यांचा विकास, अशी संकल्पना आहे. मात्र शेतकरी वर्गाच्या सोईसुविधांसाठी असलेल्या तलाठी संवर्गातील तसेच मंडळ अधिकारी संवगार्तील अनेक पदे रिक्त असल्याने शेतकर्‍यांच्या कामाचा खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे.