गोंदिया,दि.19 : गर्भवती महिला व लहान मुलांना रुग्णसेवा देता यावी यासाठी आरोग्य विभागाकडून १0२ रुग्णवाहिका सेवा पुरविली जाते. मात्र, शासनाकडून कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीकडून या रुग्णवाहिकेवर पुरविण्यात आलेल्या वाहन चालकांना वेळेवर व नियमानुसार वेतन देण्यात येत नसल्याने जिल्ह्यातील सर्व ७८ रुग्णवाहिकेच्या चालकांनी १८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १0२ रुग्णवाहिका सेवा विस्कळीत झाली आहे. ज्याचा फटका गर्भवती महिला रुग्ण व बाल रुग्णांना बसत आहे.
रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा त्यांना वेळेवर आरोग्य सेवाब मिळावी यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून १0८ व १0२ ही रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात आली आहे. एखादे अपघात घडल्यास तातडीने आरोग्य सेवा देता यावी यासाठी १0८ ही सेवा पुरविण्यात आली त्याच प्रमाणे गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अथवा लहान मुलाना आरोग्य सेवा पुरविता यावी याकरीता रुग्णालयात सोडून देण्यासाठी १0२ ही टोल फ्री क्रमांकाची सेवा पुरण्यिात आली आहे. तर याचे कंत्राट मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथील अश्कोम मिडीया प्रा. लिमीटेड या कंपनीला देण्यात आले आहे. कंपनी अंतर्गत जिल्ह्यात ७८ रुग्णवाहिका असून त्यावर चालक उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, संबंधित विभागाकडून या वाहन चालकांना तुटपुंज्या स्वरूपात मानधन देण्यात येत असून त्यांच्याकडनूाक २४ तास सेवा घेण्यात येते. तर मानधनात वाढ करण्यात यावी व इतर मागण्यांना घेऊन रुग्णवाहिकेच्या चालकांनी शासकीय रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालक संघटना, गोंदिया जिल्हाच्या माध्यमातून संबंधित कंपनी व संबंधित आरोग्य विभागाकडे मागणी केली मात्र, अद्यापही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. परिणामी आपल्या मागण्यांना घेऊन सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, यांना निवदेन देऊन रुगणवाहिकेच्या चालकांनी आमरण उपोषण पुकारले असून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर निवेदनाच्या प्रत जिप. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा अरोग्य अधिकारी, जिप. अध्यक्ष, उपाध्यक्ष शिक्षण व आरोग्य समिती, आयुक्त कुटुंब कल्याण व संचालक रा. आ. अभियान, यांच्यासह खा. सुनील मेंढे व जिल्ह्यातील चारही आमदार पाठविण्यात आल्या आहेत.
सादर निवेदनानुसार केंद्र शासनाने २४ जुलै २0१९ ला लागू केलेल्या नियमानुसार कामगारांचा बेसीकमध्ये वाढ करून जुलै २0१९ पासून मानधन देण्यात यावे, साप्ताहिक सुट्टी, सी.एल. इ.एल,व मेडीकल आदी रजा मंजूर करण्यात याव्यात., कामाचे आठ तास निश्चित करणे, त्या व््यतिरीक्त काम झाल्यास अतिरीक्त मोबदला देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जोपयर्ंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपयर्ंत आंदोलन सुरू राहणार असा पवित्रा रुग्णवाहिका चालकांनी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही महत्वाची सेवा खोळंबली असून याचा फटका मात्र, रुग्णांना बसत आहे..




