24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ बालकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची माहिती पोलिसांना निर्भयपणे द्या.-ठाणेदार अनिल कुंभरे

बालकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची माहिती पोलिसांना निर्भयपणे द्या.-ठाणेदार अनिल कुंभरे

0
41

नवेगावबांध दिं.20: प्रत्येकाला जगण्याचा, विकासाचा, सहभागाचा व संरक्षणाचा अधिकार आहे. बालकावर होणारा अन्याय व अत्याचाराची माहिती न लपविता निर्भयपणे पोलिसांना द्यावी. असे आवाहन नवेगावबांध पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुंभरे यांनी केले आहे.ते नवेगावबांध पोलीस ठाणे अंतर्गत नत्थुजी पाटील पुस्तोडे आदिवासी अनुदानित आश्रम शाळा देवलगाव येथे दिं 18 नोव्हेंबरला आयोजित बालकांचे हक्क व सुरक्षितता जाणीव जागृती सप्ताह अंतर्गत आयोजित कार्यक्रमात बालकांचे हक्क व सुरक्षितता यावर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एम. पी. कुरुसुंगे हे होते. यावेळी विद्यालयातील शिक्षक कापगते, लांजेवार, बहादुरे, लंजे, आडे, भुजाडे, खुणे, कंगाले, मेंढे अतिथी म्हणून उपस्थित होते.प्रारंभी शारदा माता व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.मार्गदर्शन करताना ठाणेदार कुंभरे यांनी, आपल्या भाषणात बाल न्याय कायदा 2015,बालमजूर कायदा 2016, बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 याची माहिती दिली. पोलीस कायद्याची अंमलबजावणी कशी करतात. त्याबाबतचे काय कायदे आहेत. यावरही त्यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला. त्याबरोबरच पोलीस काका व पोलीस दीदी या संकल्पनेबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

तसेच मुला मुलींवर होणाऱ्या अन्याय वअत्याचाराची माहिती न घाबरता पोलिसांना तसेच बाल कल्याण समिती गोंदिया यांच्या हेल्पलाइन क्रमांक 1098 यावर निर्भयपणे द्यावी. यासाठी आई, वडील व शिक्षकांची मदत घ्यावी असे आव्हानही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. पोलीस नायक मेश्राम यांनी वाहतुकीचे नियमन याबाबत मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री कुरसंगे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन एस.जे. लंजे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार एच. एच. आडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार कोडापे, पोलिस नायक अलीराम ताराम, मेश्राम, कोकोडे, पोलीस शिपाई आनंद रुद्रवाड यांनी सहकार्य केले.
सदर कार्यक्रमाला आश्रम शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व 450 विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.