25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ ‘जागो ग्राहक जागो’ मोहिमेंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

‘जागो ग्राहक जागो’ मोहिमेंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

0
46

वाशिम, दि. २१ : ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेंतर्गत वाशिम जिह्यातील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर नियुक्त अशासकीय सदस्यांसाठी १९ नोव्हेंबर रोजी  एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजित करण्यात आले होते. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष ए. बी. जोशी यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव होते.

यावेळी श्री. जोशी यांना उपस्थितांना ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अनुसार राज्य व जिल्हा मंचाचे कामकाज, न्यायदान प्रक्रियेमध्ये ग्राहकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण, रेरा कायदा या विषयांवर मार्गदर्शन केले. तर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. जाधव यांनी अन्न सुरक्षा कायदा, ई-पॉस मशीनबाबत माहिती दिली. तसेच भेसळीबाबत किंवा वस्तूचा दर्जा ठरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रयोग शाळांची माहिती व त्यांचे कार्य याबाबत मार्गदर्शन केले.वैधमापन शास्त्रचे सहाय्यक नियंत्रक एस. वाय. अभंगे यांनी थेट विक्री करणाऱ्या कंपन्यांचे कामकाज व त्यांच्या विरुद्ध येणाऱ्या तक्रारींचे निराकरण याबाबत माहिती तसेच वैधमापन शास्त्र यंत्रणेचे कार्य व यंत्रणेचे संगणकीकरण इत्यादी माहिती विषयी माहिती दिली.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सुधीर घोडचर यांनी वस्तू व सेवा खरेदीमध्ये होणारी ग्राहकांची फसवणूक व त्याचे निराकरण, ग्राहकांचे विविध हक्क आदी विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी कृषि उपसंचालक एस. के. पडघान, पुरवठा निरीक्षक एन. आर. पठाण, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रा. विरेंद्रसिंह ठाकूर, वनमाला पेंढारकर, संजय राऊत, प्रमोद गंडागुळे, कृष्णा चौधरी, एन. जी. जाधव, बी. एन. सानप, भागवत कोल्हे, गजानन साळी, अभय खेडकर, सुधीर देशपांडे, प्रवीण वानखेडे, प्रसन्न पळसकर, एस. टी. मराठे, डॉ. शुभांगी अहिर, सौ. अलका पाटील, राजेंद्र इंगळे, प्रफुल्ल बानगावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा निरीक्षक सुमित्रा इलमले यांनी केले आभार कनिष्ठ लिपिक सुधाकर रणखांब यांनी मानले.