27.4 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमेला अभिवादन

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमेला अभिवादन

0
42

मुंबईदि.29 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह नवीन शपथविधी झालेल्या मंत्र्यांनी आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नव्या मंत्रिमंडळातील मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदेसुभाष देसाईजयंत पाटीलछगन भुजबळबाळासाहेब थोरातनितीन राऊत आदींसह खासदार विनायक राऊतअनिल देसाईमाजी मंत्री दिवाकर रावते, डॉ.दीपक सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरेआमदार आदित्य ठाकरे व त्यांचे मावस बंधू वरूण सरदेसाईआमदार अब्दुल सत्तारसंजय शिरसाठशशिकांत खेडेकरसंजय राठोडविजय शिवतारेमाजी आमदार सर्वश्री जयप्रकाश मुंदडासुभाष साबणेप्रकाश शेंडगेसरदार तारासिंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.