34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते पदी निवड

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते पदी निवड

0
54

blank

मुंबई,दि.01 – राज्यातील सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी बाकांवर बसावे लागले आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मंत्री जयंत पाटील,नितीन राऊत,सुभाष देसाई,एकनाथ शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन करीत विरोधी पक्षाच्या खुर्चीवर स्थानापन्न केले.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २०१४ ते २०१९ असा सलग ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा बहुमान माजी मुख्यमंत्री वसंतदादा नाईक यांच्यानंतर फडणवीसांना मिळाला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळातही देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार अवघ्या ४ दिवसात कोसळलं. त्यामुळे अल्पकाळाचं सरकार म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास आहे. सध्या विधानसभेत सरकारच्या बाजूने १६९ आमदारांचे पाठबळ आहे, तर उर्वरित आमदारांमध्ये १०५ भाजपाचे आमदार अन् इतर असे संख्याबळ आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाला विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर विरोधी पक्षनेत्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली. शनिवारी झालेल्या बहुमत चाचणीत ठाकरे सरकार यशस्वी झाले.मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीसांचे अभिनंदन करीत  विरोधी म्हणून नव्हे तर मित्र म्हणूनच आम्ही तुम्हाला बघू सभागृहात आपण फक्त विकासासाठी सहकार्य करा.आपल्या सर्वांनाच शेतकर्यांचा सात बारा कोरा करायचा आहे,यासाठी आपल्या सर्वांचीच गरज आहे.आम्ही आजही हिंदुत्वावर कायम आहोत असेही ठाकरे म्हणाले.तर राष्टवादीचे नेते जंयत पाटील यांनी विरोधी पक्षाचे पद व मुख्यमंत्र्याचे पद सारखेच आहे.फक्त जागा बदलली आहे.जागेवर बसूनच आपण सहकार्य कराल मागच्या सदस्यांना समोर जा असे म्हणनार नाही असे म्हणत फडणवीसांचे अभिनंदन केले.

blank