24.9 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home राजकीय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा कार्यक्रम

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा कार्यक्रम

0
44

भंडारा  दि. 4 :- महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ना. नाना पटोले हे  5 डिसेंबर 2019 रोजी भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम या प्रमाणे आहे.5 डिसेंबर रोजी जवाहर नगर पेट्रोलपंप, शहापूर, मुजबी, बेला नागपूर नाका, हॉटेल रॉयल प्लाझा येथे सत्कार समारंभांना उपस्थिती. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित भंडारा जिल्हा-विकास कामांचा जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत विभागनिहाय आढावा बैठकीस उपस्थित राहतील.  दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थिती. सायंकाळी 3.45 वाजता जागतिक मृदा संवर्धन दिनानिमित्त कृषी विभामार्फत स्वागत लॉन सभागृह लाखनी येथे आयोजित कृषी प्रदर्शनास भेट देतील.  सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह, लाखनी येथे राखीव. सायंकाळी 5.30 वाजता लहरीबाबा मठ साकोली येथे सत्कार समारंभास उपस्थिती. सोईनुसार मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

blank