गोंदिया,दि.0६ : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमीत्त आज ६ डिसेंबर रोजी स्थानिक आॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ दरम्यान, संघटनेच्या वतीने सकाळी १० वाजाता येथील जयस्तंभ चौक बसस्थानक येथे आदरांजली कार्यक्रम पार पडणार असून यावेळी नि:शुल्क संविधान पुस्तिकेचे वितरण करण्यात येणार आहे़ तर यांनतर दुपारी १ वाजता पांगोली नदी परिसरातील भिमघाट येथे मानवंदना करून तेथील उपस्थितांना संविधान पुस्तिकेचे वितरण करण्यात येणार आहे़
तेव्हा या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तित-जास्त संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन आॅटो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष सतिश समुद्रे व कार्यक्रमाचे संयोजक सुनील गणवीर यांनी केले आहे़





