24.9 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय ओबीसी महासंघ कर्मचारी वर्धा जिल्हाध्यक्षपदी छत्रपती फाटे

राष्ट्रीय ओबीसी महासंघ कर्मचारी वर्धा जिल्हाध्यक्षपदी छत्रपती फाटे

0
39

वर्धा,दि.09: राष्ट्रीय ओबीसी महासंघप्रणीत राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी, अधिकारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली असून, छत्रपती फाटे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्याम लेंडे,जिल्हा सल्लागार रामराव हरडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत वर्धा जिल्हा कार्यकरणीची निवड करण्यात आली.वर्धा जिल्हा सरचिटणीसपदी नवीनप्रकाश जुमडे व इतर पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. सर्वांनी मार्गदर्शन केले, नवनिर्वाचितांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.

blank