29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home Featured News गोदियाची सुन भाग्यश्री बहेकार (करडे) बनली मिसेस महाराष्ट्र रनरअप

गोदियाची सुन भाग्यश्री बहेकार (करडे) बनली मिसेस महाराष्ट्र रनरअप

0
95
  • स्टाइल आयकॉन २०१९ चा मिळाला सन्मान
  • सन्मान पटकवत गोदिया व नागपूरचे मान संपुर्ण महाराष्ट्रात वाढवले

गोंदिया,दि.14ः पुणे येथे “दिवा पॅजंट मिसेस महाराष्ट्र”  सिजन ४ स्पर्धा ०४ ते ०८ डिसेबंरपर्यंत आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेच्या ८ डिसेंबरला झालेल्या ग्रॅड फीनाले मध्ये गोंदियाची सुन असलेल्या भाग्यश्री सावन बहेकार(करडे)ने सिनेसृष्टी,फॅशन, उद्योजक व कार्पोरेट जगातील महत्त्वपुर्ण लोकांच्या उपस्थितीत मिसेस महाराष्ट्र रनरअपचा पुरस्कार पटकावला.विशेष म्हणजे भाग्यश्रीने आयोजित मिसेस महाराष्ट्र 2019 स्पर्धेत २ महत्वपुर्ण सन्मान पटकावून विजेती ठरली. भाग्यश्रीला मिसेस महाराष्ट्र रनरअप पुरस्कारासोबतच स्टाईल आयकॉन २०१९ चा सन्मान पण मिळाला.

“ दिवा पॅजंट मिसेस महाराष्ट्र” ही स्पर्धा सर्व सौंदर्यवतींसाठी अत्यंत महत्वाची व मानाची अशी समजली जाते. ह्या स्पर्धेचे आयोजन अंजना मॅस्केरेहांस संचालक दिवा पॅजंट व मार्गदर्शन व  कार्यक्रमाला दिशा देण्याचे कार्य कार्ल मॅस्केरेहांस संचालक दिवा पॅजंट यांनी चांगल्या पद्धतीने केले.स्पर्धेचे परिक्षक व पाहुणे म्हणून बॉलिवूड अभिनेत्री व मिस इंडिया झोया अफरोज, मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर व प्रसिद्ध अभिनेता गुलशन ग्रोवर हे उपस्थीत होते.

मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत एकुण ५० सौदर्यवतींची निवड विविध शहरांमध्ये ऑडिशन (मुलाखत) घेवून करण्यात आली. असे राज्यातून एकुण ५० सौदर्यवतींना मुख्य स्पर्धेसाठी (फीनालेसाठी) पुणे येथे आमंत्रित करण्यात आले होते. ४ ते ८ डिसेंबर पर्यंत चाललेल्या स्पर्धेत प्रत्येक प्रतिस्पर्धीना स्पर्धेकरीता  आयोजकांतर्फे  मागदर्शन, विशेष प्रशिक्षणपण  देण्यात आले. स्पर्धेतील ५ दिवसामध्ये विविध बाजु व मुद्यांवर  भर देत विशेष टॅलेंट व सौंदर्य प्रतिस्पर्धीची निवड करण्यात आले.ज्यामधे सौंदर्यासोबतच विशेष टॅलेंट राऊंडसह  प्रश्न- उत्तरांच्या माध्यमातून स्पर्धेकाची वागणूक,बोलचाल,आत्मविश्वास,भाषेवरील नियंत्रण,बोलण्याची व  विचार करण्याची  शैली, बौध्दीक स्पर्धा, स्वपरिचय, आकर्षक देहबोली अश्या वेगवेगळ्या पातळ्यांवर  (राऊंड मध्ये) भाग्यश्री बहेकार (करडे) हिने विशेष अंक मिळविल्याने मिसेस महाराष्ट्रच्या रनरअपसह स्टाईल आयकाॅन पुरस्काराची मानकरी ठरली.

भाग्यश्री बहेकारचे जन्म नागपूरमधील करडे परिवारात झाले असून तिचे शिक्षण पण नागपूरमधेच झाले.भाग्यश्रीने बि.ई. व एम. टेक इलेक्ट्रीकल केले असून एक इलेक्ट्रीकल इंजिनियर आहे. २००५ ते २०१८ पर्यत भाग्यश्री रायसोनी कॉलेज नागपुरमध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होती.भाग्यश्रीचे लग्न २०१८ मधे गोदियातील  पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते सावन जगदिश बहेकार यांच्याशी झाले व लग्नानंतर  भाग्यश्री गोंदियातील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजला कार्यरत आहे.भाग्यश्री बहेकार यांना सामाजीक क्षेत्रात व पर्यावरण क्षेत्रात कार्य करण्याची आवड आहे. त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. भाग्यश्री यांनी आपल्या सन्मानाचे यशाचे श्रेय परिवारातील सदस्यांना व गुरुजनांना दिले. जे तिच्या पाठीशी सतत आधारस्तंभ म्हणून तिला नेहमी साथ देतात.गोंदियाची सून म्हणून भाग्यश्री बहेकार यांनी हा पुरस्कार पटकावून शहरासह परिवाराचे नाव उज्वल केले आहे.

blank