गोंदिया,दि.19 :- धानाला प्रति क्विंटल २ हजार ५०० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी बुधवारला हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात भंडारा- गोंदिया जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाèयांनी मागणीचे निवेदन दिले. यावेळी खा. सुनिल तटकरे उपस्थित होते. भंडारा- गोंदिया सोबतच पूर्व विदर्भात मोठया प्रमाणावर धानाचे उत्पादन घेतल्या जाते. पूर्व विदर्भातील शेतकèयांचे धान हेच मुख्य उत्पादन आहे. सध्याच्या काळात केंद्र शासनाकडून धानाला १८१५ रुपये प्रति.्िनवंटल भाव घोषित आहे. सोबतच राज्य शासनाकडून धानाला १५१५ रुपये प्रति ्िनवंटल भाव घोषित आहे. सोबतच राज्य शासनाकडून ५०० रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.राज्य शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या ५०० रुपये बोनस मध्ये १८५ रुपयांची वाढ करुन एकत्रित २५०० रुपये भाव देण्यात यावा असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली. धानाला २५०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळावा यासाठी निवेदन देणाèया शिष्टमंडळात माजी मंत्री नाना पंचबुद्धे, माजी आ. राजेंद्र जैन, भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, जि.प. पक्ष नेता गंगाधर परशुरामकर, विवेकानंद कुर्झेकर, यशवंत सोनकुसरे,जि.प.सदस्य किशोर तरोणे,सडक अर्जुनी बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशिवार,भुमेश्वर चव्हाण,लोकपाल गहाणे, लोमेश वैद्य देवचंद ठाकरे, शैलेष मयुर, सुनंदा मुंडले, याच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बहूसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





