36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News ‘पाहूणी सौख्य माझे… देवेंद्र तोही लाजे… झोपडीत माझ्या,मुख्यमंत्री ठाकरेंची फटकेबाजी

‘पाहूणी सौख्य माझे… देवेंद्र तोही लाजे… झोपडीत माझ्या,मुख्यमंत्री ठाकरेंची फटकेबाजी

0
53

blank

नागपूर,(विशेष प्रतिनिधी)दि.19ःतीन पक्षांचे सरकार टिकणार नाही अशी टीका नेहमीच भाजपकडून केली जाते. त्याचा  राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. आम्ही (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) आता एकत्र आलेलो आहोत. मनाने काम करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. हे माझे आणि एकूणच महाराष्ट्रचे वैभव आहे. याच दरम्यान, भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तुकडोजी महाराजांचे अभंग सुद्धा सादर केले. “पाहूणी सौख्य माझे… देवेंद्र तोही लाजे… शांती सदा विराजे… झोपडीत माझ्या…” अर्थातच हे सरकार ऑटो रिक्षा सरकार आणि गोर-गरीबांचे सरकार आहे. बुलेट ट्रेनचे सरकार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर देत भाषणादरम्यान तुफान फटकेबाजी केली. देवेद्र फडणवीस यांच्या भारूडांना त्यांनी अभंगांच्या माध्यमातून उत्तर दिले. आज ज्ञानदेव असते तर म्हणाले असते, अच्छे दिन येईची ना, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख येईची ना, असे म्हणत त्यांनी सभागृहात तुफान फटकेबाजी केली. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.केंद्र सरकारने बनवलेला कायदा देशभर सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक असेल तर मग गोव्यात गोहत्या बंदी कायदा का लागू झाला नाही? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप आणि केंद्र सरकारला केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना भाजपवर टोलेबाजी केली. गरीबांना तीन चाकी रिक्शाच परवडते असे ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी तीन चाकी ऑटो रिक्शा सरकार असे म्हटले होते. दरम्यान, आम्ही दिलेला शब्द नेहमी पाळला आणि यापुढे देखील शब्द राखणार आहोत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

अच्छे दिन येईची ना, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख येईची ना… देशातील बेकारी हटेची ना… दोन कोटी लोकांना रोजगार मिळेची ना… स्मार्ट सिटी होईची ना… नोटबंदी नंतरचे ५० दिवस संपेची ना…विदेशातील काळा पैसा भारतात येईची ना… देशातील आर्थिक मंदी जाईची ना…असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडेबोल सुनावले. ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी विचारले की, शिवसेनेचा मुख्यमंत्री काँग्रेसच्या पाठिंब्याने करणार, असे वचन बाळासाहेबांना दिला होतं का? मी त्यांना सांगू इच्छितो की, काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असे म्हणालो नव्हतो. पण, दिलेल्या शब्दाच कौतूक तुम्हाला कधीपासून होऊ लागले आहे. मी बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणत्याही टोकाला जाईल आणि बाळासाहेबांचं वचन पूर्ण करेल. आम्ही दिलेला शब्द पाळतो, यापूढेही पाळणार. विशेष म्हणजे मी असेही म्हणालो होतो की, भाजपाची पालखी आयुष्यभर वाहणार नाही. भाजपाचे ओझे वाहत होतो. ते खांद्यावरून उतरवले आहे,” असे उत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

blank