24.9 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकारांचे प्रबोधन २0 पासून

तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकारांचे प्रबोधन २0 पासून

0
104

देवरी,दि.19 : अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ वा पुण्यतिथी महोत्सवनिमित्त २0 ते २२ डिसेंबर दरम्यान पंचशील चौकातील समाज मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमात राष्ट्रीय किर्तनकार लक्ष्मनदास काळे महाराजांचा जाहीर कीर्तन तथा प्रबोधन २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता होणार आहे.
तीन दिवसीय महोत्सवात २0 डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नगराध्यक्ष कौशल्याताई कुंभरे यांच्या हस्ते तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना व दिप प्रज्वलन करण्यात येणार आहे. यावेळी उपाध्यक्ष आफताब शेख, नगर पंचायत सभापती माया निर्वाण, किशोर गावळ तसेच धुकेश्‍वरी मंदिर साई सेवा समिती, नवयुवक किसान गणेश मंडळ, समता गणेश मंडळ, त्रिमुर्ती गणेश मंडळ, सरगम गणेश मंडळ, न्यु गणेश मंडळ, न्यु बच्चा शारदा मंडळ, मस्कर्‍या गणेश मंडळ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
२१ डिसेंबर रोजी सकाळी ५.३0 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक प्रार्थना, दुपारी १२ वाजता भव्य रक्तदान शिबिर, ४ वाजता रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना आणि रात्री ८ वाजता मोझरी येथील राष्ट्रीय किर्तनकार लक्ष्मनदास काळे महाराजांचे जाहिर किर्तन तथा प्रबोधन होईल. २२ डिसेंबर रोजी सकाळी ५.३0 वाजता सामुदायिक प्रार्थना, योगासन, ९ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, दुपारी १२ ते ३ किर्तन व गोपाळकाला आणि सायंकाळ ५ वाजता सामुदायिक प्रार्थना, बक्षिस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.
यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, सहायक आयुक्त मंगेश ानखेडे, तहसीलदार वजय बोरूडे, सभापती रमेश ताराम, पोलिस उपअधिक्षक वासुदेव वांढरे, डॉ.विजय कोळेकर, जि.प.सदस्या उषा शहारे, संस्था सचिव अनिल येरणे, प्राचार्य के.सी.शहारे, मनोज भुरे, मंगलमुर्ती सयाम, सुरेश चन्ने, सुजीत टेटे आदि उपस्थित राहणार आहेत.

blank