34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home महाराष्ट्र अकोला येथे दिनांक 2७ ते २९ डिसेंबर २०१९ दरम्यान राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनीचे...

अकोला येथे दिनांक 2७ ते २९ डिसेंबर २०१९ दरम्यान राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनीचे आयोजन

0
34

गडचिरोली,दि.20:- डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख १२१ व्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विस्‍तार शिक्षण संचालनालय, डॉ. पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारे कृषी विद्यापीठ क्रीडांगण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ ,अकोला येथे आत्मा, कृषी विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद व संलग्न संस्था यांच्या सहकार्याने दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०१९ दरम्यान ॲग्रोटेक २०१९ राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनी व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध क्षेत्रात सातत्याने विकसित होणाऱ्या कृषी तंत्रज्ञानाची माहिती एका छताखाली शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता आयोजित कृषी प्रदर्शनी मध्ये कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था तसेच इतर खाजगी संस्थामार्फत विकसीत तंत्रज्ञान उपलब्ध केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने फळबाग, भाजीपाला, फुलशेती,वनोषधी, कापूस ,ज्वारी कडधान्य ,तेलबिया, पाणलोट विकास,ऊस, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, मत्स्य संर्वधन एकात्मिक कीड व्यवस्थापन इत्यादी इतर संलग्न संस्था तसेच कृषी निविष्ठा व कृषी अवजारे या दालनांसोबतच बचत गटांची दालने सुद्धा राहणार आहे. या शिवाय शेतकरी बंधू भगिनींचे कृषी आधारित ग्रामीण उद्योगाची जोडधंदे  दालने या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. तीनही दिवस प्रदर्शनी सकाळी १० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत खुली राहील.

या प्रदर्शनीत दरम्यान दुपारी २.०० ते ४.००  या वेळेत तीनही दिवस चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्र कार्यक्रमांमध्ये कृषि शास्त्रज्ञ शेती बांधवासोबत हितगुंजन साधणार आहेत.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ,अकोला द्वारे आयोजित या प्रदर्शनीचा आपण लाभ घ्यावा व आपल्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषी प्रदर्शनी व चर्चासत्राचा लाभ घेण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे. याकरिता आपल्या संपर्कातील शेतकरी बंधू व भगिनींना प्रोत्साहित करण्यात यावे, असे डॉ. दिलीप मानकर संचालक विस्तार शिक्षण यांनी कळविले आहे .

blank