33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Featured News गोंदियात साकारतेय बाबासाहेबांवर चित्रपट; २२ डिसेंबर पासून चित्रीकरणाला सुरुवात

गोंदियात साकारतेय बाबासाहेबांवर चित्रपट; २२ डिसेंबर पासून चित्रीकरणाला सुरुवात

0
44

गोंदिया,दि. 20 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित बालपण ते संपूर्ण आयुष्य, त्यांनी केलेला संघर्ष, समाजाला दाखविलेली दिशा आणि हिंदू कोडबील ते चवदार तळा अशी संपूर्ण कारकिर्द यांची माहिती देणारा हिंदी चित्रपट गोंदियात साकारत आहे.
त्याकरिता भीमयूग फिल्म आणि आंबेडकरी अनुयायी फिल्म निर्माण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चित्रपटात स्थानिक कलावंतांना संधी देण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्ह्यातील २२ विविध ठिकाणांवर चित्रीकरण करण्यात येणार आहे. अप्रतीम गाणे, कॅमेरा आणि उत्कृष्ट अशा ध्वनीचा वापर करण्यात येणार आङे. मुंबईचे प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर दा यांच्या नेतृत्वात हा चित्रपट तयार होणार आहे.ओरीसा येथील संध्या सिंह या रमाबाई आंबेडकर यांची तर प्रथमेश गजभिये हा बालपणातील बाबासाहेबांची भूमिका साकारणार आहेत. निर्माता म्हणून संतोष लिल्हारे, विरेंद्र गजभिये जबाबदारी सांभाळणार आहेत. हा चित्रपट इतिहास घडविणार असल्याचा आशावाद दिग्दर्शक कबीर दा आणि सुनील भालेराव यांनी व्यक्त केला. चित्रपटात उदित नारायण यांच्या आवाजात गाणे असणार असून येत्या २२ डिसेंबर रोजी भिमनगर येथील मैदानात चित्रपटाची निर्मिती सुरू होणार आहे. १० एप्रिल रोजी संपूर्ण देशात चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. यावेळी कमलेश उके, प्रथम उके, संध्या सिंग, भाऊराव गजभिये, सुनील भालेराव, संतोष लिल्हारे, डॉ. पाटील, रियाज सय्यद, महेंद्र चौरे, धीरज मेश्राम, निलेश देशभ्रतार, सपना देशभ्रतार, सविता उके, समता गणवीर आदी उपस्थित होते.

blank