36.5 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home Top News पुढील वर्षी चिप नसलेले एटीएम होणार बंद

पुढील वर्षी चिप नसलेले एटीएम होणार बंद

0
27

भंडारा,दि.27 :- ज्या एटीममध्ये ईव्हीएम चिप नाही अशी अनेक एटीएम कम डेबिट कार्ड बंद येत्या ३१ डिसेंबरला बंद होणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील आपल्या खातेदारांना इशारा दिला आहे. ग्राहकांनी कार्ड बदलण्यासाठी त्वरित बँकेशी संपर्क साधावा. असे कळविण्यात आले आहे. उल्लेखणीय असे की, जानेवारी २०२० पासून ईव्हीएम चिप नसणारी कार्ड पूर्णपणे बंद होतील. एसबीआयने म्हटले आहे की, ज्या एटीएम कम डेबिट कार्डमध्ये चुंबकीय पट्टे आहेत ते कार्ड बंद होतील.

१ जानेवारी २०२० पासून केवळ ईएमव्ही चिप आणि पिन असलेली कार्डेच वापरता येतील. रिझव्र्ह बँक ऑफइंडियाच्या आदेशानुसार देशात कार्यरत सर्व बँकांना या वर्षाच्या अखेरपयंर्त चुंबकीय पट्टे असलेले डेबिट कार्डचा वापर पूर्णपणे थांबवावे लागणार आहे. या आदेशानुसार एसबीआयने हे पाऊल उचलले आहे. देशातील बँक ग्राहकांना वेगवेगळ्या कारणांनी फसवणुकीला समोरे जोवे लागते ही होणारी फसवणुक टाळण्यासाठी बँकांना आरबीआय कडून अशा सूचना मिळाल्या आहेत. बèयाच नवीन ग्राहकांना ईएमव्ही चिप असलेले डेबिट कार्ड दिले जात आहे. चुंबकीयपट्टी असलेले डेबिट कार्ड असलेल्या कार्डने ग्राहक ३१ डिसेंबरनंतर पैसे काढू शकणार नाहीत.