39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ जनगणनेसाठी चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिले निवेदन

जनगणनेसाठी चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिले निवेदन

0
37

चंद्रपूर,दि.07 :येत्या एप्रिल महिन्यापासून सुरु होत असलेल्या राष्ट्रिय जनगणना कार्यक्रमात ओबीसींची स्वतंत्र जातगणना करण्यात यावे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात निवेदन सादर करण्यात आले.जनगणनेसाठी महासंघ सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे.त्यातच 2021 मध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात येईल असे आश्वासन तत्कालीन गृहमंत्री व विद्यामान सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले होते.सत्तेत येण्यासाठी ओबीसींचा उपयोग केला परंतु आज मात्र जनगणनेचे जे पत्रक तयार करण्यात आले,त्यात ओबीसींचा कुठेच उल्लेख नसल्याने केंद्रातील भाजप सरकार आपल्या आश्वासनाला विसरल्याने आठवण करुन देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जनगणना करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारीमार्फेत  जिल्हाधिकारी यांना राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांच्या नावे पाठविण्यात आले.

चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, सचिव सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, प्रा. अशोक पोफळे, प्रा. दिलीप हेपट, शाम लेडे, विजय पिदुरकर, रंजीत डवरे, गणेश आवारी, संदीप ढोबळे, ओमदास तुराणकर, प्रा. शरद कूत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. जोत्स्ना राजुरकर, प्रा. विद्या शिंदे, प्रा. सरीता बिन्कूलवार, प्रा. मंजूला निमकर, प्रा. मीनाक्षी पावडे, प्रा. मोहीणी गोहोकर, चंदू बुरडकर, दिलीप पायपरे, एस.डी. वांढरे, व्ही.टी. लिपटे, रामदास कामडी, यु.एम. पिंपळशेंडे, रवि लोणकर, राजेन्द्र खनके, दिलीप कौरासे, रामदास हरडे, आदी अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते.blank

सावलीः-राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा सावलीच्या वतीने अविनाश पाल यांच्या नेतृत्वात ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २०२१ च्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना तहसिलदार सावली मार्फत निवेदन पाठविण्यात आले.यावेळी पंचायत समिती सावलीचे सदस्य गणपतराव कोठारे, भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, किशोर वाकुडकर,विनोद भुरसे, दिवाकर गेडाम,पुनम झाडे,सुधाकर गोबाडे,तुळशीदास भुरले, अनिल म्हशाखेत्री, अशोक ठीकरे, अशोक भांडेकर, मुकेश भूरसे तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
चिमूरः- ओबीसी समाजाची जनगणना २०२१ मध्ये करण्यात यावी या मागणीला घेऊन तहसीलदार नागतिळक यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी धर्मदास पानसे(जिल्हा सल्लागार ),आर.एम.शेंडे (तालूका-अध्यक्ष),मनोज कामडी(तालूका-सरचिटणीस),कवडू लोहकरे(तालूका-कोषाध्यक्ष),मार्गदर्शक पिठाळे तसेच लवनक (उपाध्यक्ष),उताने ,विकास नखाते,ताराचंद बोरकूटे,पटवारी कोहपरे, वामन बांगडे  संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.