गडचिरोली दि.07 : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा दर्पण दिनाचा कार्यक्रम संपादक संघाच्या कार्यालयात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कांतीभाई सुचक हे होते. तर सत्कार मुर्ती जिल्हा माहिती अधिकारी, सचिन अडसूळ तसेच प्रमुख अतिथी केशवराव दशमुखे हे होते.वृत्तपत्र हे लहान असो की मोठे असो त्यांच्या बातम्या वाचकापर्यत पोहचल्या पाहीजे याची काळजी संपादकांनी घ्यावी. दर्जदार बातम्या देवून गडचिरोली अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडाव्यात. अश्या प्रकारची माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कांतीभाई सुचक यांनी दर्पणकार जांभेकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला व संपादक संघाच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान गेडाम संचलन मुनिश्वर बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती नालंदा देशपांडे यांनी केले.कार्यक्रमास नरेंद्र माहेश्वरी, मुकुंद जोशी, अनूप मेश्राम, प्रकाश सोरते, श्रीमती नालंदा देशपांडे, श्रीमती रेखाताई वंजारी, कोटरंगे, वामन खंडाईत आदी सहीत बहुसंख्यक पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.
सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन’ साजरा
सालेकसाः– पत्रकार व वृत्तपत्र हे समाजाला आकार देण्याचे काम करीत असतात. मराठीतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित करून बाळशास्त्री जांभेकर यांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवल्याचे प्रतिपादन तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी साखरीटोला येथे केले.साखरीटोला महाविद्यालय साखरीटोला येथे तालुका मराठी पत्रकार संघाचे वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे शुभारंभ पूर्ति शिक्षण संस्थेचे सचिव व तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेन्द्र बड़ोले यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या चित्रासमोर दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, सचिव प्रा.सागर काटेखाये, कुलतारसिंग भाटिया, चंद्रकुमार बहेकार, किसन चकोले, प्रा. विवेक बहेकार, प्रा. बिसेन मॅडम, प्रा. चौरागडे मॅडम उपस्थित होते, यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.चालन प्रा. कटरे यांनी तर उपस्थिताचे आभार प्रा. बहेकार यांनी मानले.
पत्रकार समन्वय कृती समितीच्या वतीने पत्रकार दिन साजरा
भंडाराः– दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस ६ जानेवारी मराठी पत्रकार दिन म्हणून पत्रकार समन्वय कृती समिती भंडारा च्यावतीने विश्राम गृह भंडारा येथे मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र टाईम्सचे जिल्हा प्रतिनिधी राजू मस्के व ई टीव्ही भारतचे जिल्हा प्रतिनिधी दिपेंद्र गोस्वामी यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत श्रिकोंडवार, दै. लोकजनचे जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ ढोमणे व भंडारा एक्सप्रेसचे संपादक अजय मेश्राम, सागर भांडारकर व इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.