33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ १९ जानेवारी रोजी बुद्ध आणि त्याचा धम्म व भारतीय संविधानावर आधारित प्रश्नस्पर्धा

१९ जानेवारी रोजी बुद्ध आणि त्याचा धम्म व भारतीय संविधानावर आधारित प्रश्नस्पर्धा

0
37

नागपूर,दि.12ः-दीक्षाभूमी स्मारक समिती व प्रयास सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 19 जानेवारी 2020 ला सकाळी 10 वाजता दीक्षाभूमीच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत- बुद्ध आणि त्यांचा धम्म व भारतीय संविधान या ग्रथांवर आयोजित-मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेत वस्तुनिष्ठ प्रश्न स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या धम्मज्ञान परीक्षेत बंधू भगिनींना बहुसंख्येने सहभागी होण्यासाठी आज रविवार12 जानेवारीला दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष धम्मसेना नायक पुज्य.भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी, सुजाता बुद्धविहार, लुंबीनी नगर एस.आर.पी.एफ.गेट हिंगणा रोड, सम्यक बुद्धविहार, सि.आर.पी.एफ. हिंगणा रोड, बौद्ध हक्क परिषद हिंगणा येथे भेट देऊन उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी भन्ते प्रज्ञाबोधी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक इंदोरा बुद्धविहार समितीचे संचालक विक्रांत गजभिये, संचालन- हिंगणा तालुका संयुक्त बुद्धविहार समितीचे संचालक- महेश वासनिक व आभार- सुभम डाहाट यांनी केले सभेला परिसरातील बुद्धविहार समित्यांचे पदाधिकारी व बंधू भगिनी उपस्थित होते.