38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ जगत महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त व्याख्यान

जगत महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त व्याख्यान

0
58

गोरेगाव,दि.12:-स्थानिक जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मराठी वाङमय मंडळव्दारा ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. वाय.लंजे तर प्रमुख वक्ता म्हणून श.जा ति.आंतरराष्ट्रीय शाळा गोरेगावचे मराठी विषयाचे प्रा. मोरेश्वर पटले तर प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. एस. एच. भैरम,मराठी विभागप्रमुख डाॅ. चंद्रकुमार राहुले, ग्रंथपाल प्रा. एकनाथ चंदनखेडे, प्रा. लोकेश कटरे विचारमंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रमुख वक्ता प्रा.मोरेश्वर पटले यांनी आपल्या मार्गदर्शनातून मराठी भाषेचा होत असलेला -हास ही चिंताजनक बाब आहे त्याकरीता मराठी भाषा बोलणाणा-या प्रत्येकांनी मराठी भाषेचे संवर्धन व जतन करणे ही काळाची गरज आहे अशाप्रकारचे मौलिक विचार प्रकट केले.अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डाॅ.एन. वाय. लंजे यांनी प्रत्येक व्यक्तीला स्वभाषेचा अभिमान असले पाहिजे. अशाप्रकारचे मौलिक विचार प्रकट केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. चंद्रकुमार राहुले तर संचालन प्रा.लोकेश कटरे व मान्यवरांचे आभार प्रा. एकनाथ चंदनखेडे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.