आयआयडब्ल्यू इंडिया या देशातील आघाडीची वेल्डिंग इन्स्टिट्यूटने मेटल जॉयनिंग तंत्रांमधील वेल्डिंग सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजीला प्रगत करण्याची मोहीम आखली आहे. देशातील निवडक क्षेत्रांना साह्यकारी ठरणाऱ्या बहुआयामी उपक्रमाचे प्रदर्शन 13 व्या वेल्ड इंडिया एक्झिबिशनमध्ये केले जाणार आहे. 5000 हून अधिक वेल्डिंग प्रोफेशनल आणि खासगी आणि सार्वजनिक असे 300 उद्योग सदस्य असलेल्या आयआयडब्ल्यू इंडियाने प्रशिक्षण आणि प्रमाणन पद्धतीमध्ये नवे आखीव मार्ग आणण्याची मोहीम हाती घेतली आहे.





