तिरोडा,दि.१३: तिरोडा-ग़ोरेगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या प्रयत्नाने आदिवासी विद्याथ्र्यांची थांबलेली शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. सन २०१५ पासून कुèहाडी, हिरापूर, मलपुरी, रामाटोला, पिंडकेपार, पाथरी, मेंघाटोला, भुताईटोला, बोळूंदा, आसलपानी, खाडीपार, बागळबंद, तिमेझरी सह गिरजाबाई कन्या विद्यालय तिरोडा, स्वामी विवेकानंद विद्यालय कारंजा येथील विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती २०१५ पासून थांबलेली होती. या संबंधाची माहिती उपसरपंच रामदास ठाकुर यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापकाने रविकांत बोपचे यांना दिली. बोपचे यांनी याची दखल घेत शिक्षण व समाजकल्याण विभागात पाठपुरावा करुन रखडलेली शिष्यवृत्ती विद्याथ्र्यांच्या बँक खात्यात जमा करुन दिल्याने विद्याथ्र्यांसह शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे. तर बोपचे यांनी अधिकारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहे.





