गोरेगाव,दि.१३: तालुक्यातील शहारवानी येथील स्व.ब्रिजलाल कटरे विद्यालयाचे वार्षिक स्नेह सम्मेलन नुकतेच पार पडले. स्नेह सम्मेलनाचे उद्घाटन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड.टी.बी.कटरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त वनअधिकारी यु.टी.बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सांस्कृतीक कार्यक्रमाचे उदघटन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश नेवारे यांच्या हस्ते केंद्रप्रमुख के.एल.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी विनोद पटले, विनोद गौतम, गेंदलाल गौतम, तेजलाल पटले आदि मान्यवर उपस्थित होते. स्नेह सम्मेलनात विज्ञान प्रदर्शन, हस्तकला, रांगोळी, बुद्धीबळ स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतीक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बक्षीस वितरण सोहळा सरपंच दिप्ती पटले यांच्या अध्यक्षतेखाली गंगाधरीचे पोलीस निरीक्षक व्ही.डी.मडावी, उपनिरीक्षक निलेश उरकुडे, मुख्याध्यापक संजय बघेले, के.एस.वैद्य, पोलीस पाटील तेजलाल पटले, श्री भगत, सचिव जाधव, सावेंद्र पालेवार, इंद्रराज पटले, qचतनबाई पटले, राजकुमारी भगत, गीता येडे व गावातील मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. संचालन व आभार स्वाती पटले, दिप्ती येडे, मुस्कान बोरकर, मयुर पटले, दिनेश कटरे, अंकीत पटले यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.वाय.कटरे यांनी केले. आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.





