40.3 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ श्री चित्रगुप्त कायस्थ समाजाची सभा

श्री चित्रगुप्त कायस्थ समाजाची सभा

0
40

गोंदिया : श्री चित्रगुप्त कायस्थ समाजाची आमसभा रविवार, 12 जानेवारी रोजी समाजाचे अध्यक्ष कमलेश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मनोहर म्युनिसिपल उच्च माध्यमिक शाळेत दुपारी 3 वाजता पार पडली.यावेळी मंचावर उपाध्यक्ष रामकुमार श्रीवास्तव, सचिव अमित श्रीवास्तव, सहसचिव प्रदीप आर श्रीवास्तव, कोषाध्यक्ष योगेश वर्मा,  प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात भगवान चित्रगुप्त, स्वामी विवेकानंद व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व पूजन करून करण्यात आली. यावेळी समाजाचे अध्यक्ष कमलेश श्रीवास्तव यांनी स्वामी विवेकानंद व लालबहादूर शास्त्री यांनी देशाकरिता केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. तसेच बृजेश श्रीवास्तव यांनी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे जावून दिलेल्या आपल्या भाषणातून आपल्या देशाचे नाव लौकीक केले. तसेच लालबहादूर शास्त्री यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली व जगात आपल्या देशाची छाप संपूर्ण जगात सोडल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कोषाध्यक्ष योगेश वर्मा यांनी सन 2019 च्या आय-व्ययबाबत माहिती दिली. तसेच यावेळी उपाध्यक्ष पद रिक्त करण्यात आले होते. दरम्यान उपाध्यक्षपदी सर्वानुमते मनोज हुकूमचंद खरे यांची व कार्यकारिणी सदस्य म्हणून पियुष श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली.
संचालन बृजेशश्रीवास्तव यांनी केले. आभार कमलेश श्रीवास्तव यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहसचिव रतन श्रीवास्तव, संजय वर्मा, जितेंद्र श्रीवास्तव, सुभाष श्रीवास्तव, महिला प्रतिनिधी मोना वर्मा, करूणा श्रीवास्तव, सुरेश श्रीवास्तव, ब्रजेश श्रीवास्तव, नितीन श्रीवास्तव, मनीष श्रीवास्तव, मधू श्रीवास्तव, अर्चना श्रीवास्तव,नीरजा श्रीवास्तव सुमित श्रीवास्तव, अंजली वर्मा, नीरज वर्मा, रमेश लाल, रामकुमारी श्रीवास्तव, संजय श्रीवास्तव, रश्मी नीरज वर्मा, दिनेश आर श्रीवास्तव, भुमेश श्रीवास्तव, रमेश एम. श्रीवास्तव, मिदुप श्रीवास्तव, शुभम श्रीवास्तव, शिवकुमार श्रीवास्तव, प्रखर श्रीवास्तव आदींनी सहकार्य केले.