39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ महावितरण गोंदिया परिमंडळातर्फे विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त महारॅलीचे आयोजन

महावितरण गोंदिया परिमंडळातर्फे विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त महारॅलीचे आयोजन

0
38

गोंदिया ,दि.15ः :- महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा व कामगार विभागातर्फे दरवर्षी दि. 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताह पाळण्यात येतो त्याचे औचित्य़ साधुन जनसामान्यात विद्यूत सुरक्षिततेबाबत जनजागृती व्हावी या हेतुने महावितरण कार्यालय, गोंदिया व विद्युत निरिक्षक कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त़ विद्यमाने दि. 15 जानेवारी रोजी  सकाळी 11 वा. गोंदिया येथे महारॅली चे आयोजन करण्यात आले होते.  हि रॅली मुख्य़ अभियंता श्री . सुखदेव शेरकर व विद्युत निरिक्षक श्री. मोहन बोध यांच्या नेतृत्वात मुख्य़ अभियंता कार्यालय, राम नगर गोंदिया येथुन सुरवात होउन — पाल चौक — गुरद्वारा  — (छोटा) ओव्ह़र ब्रिज — जयस्त्ंभ चौक — गांधी प्रतिमा — गोरेलाल चौक — नेहरु पुतळा — येथुन मार्गक्रमण करित इदिरा गांधी स्टेडियम येथे रॅलीची सांगता करण्यात आली .

महावितरणतर्फे वीज ग्राहकांना सुरक्षिततेबाबत आवाहन                               

  • विद्युत उपकरणे ओल्या हातांनी हाताळु नये.
  • विजुच्या खांबास कपडे वाळत घालण्याची तार बांधु नका.
  • वीज पुरवठयासाठीची केबल ओढु नका.
  • उच्च़ दाबाच्या लाईनच्या जवळ मुलांना पतंग उडवू देउ नका.
  • आपल्या विद्युत मांडणीचे अर्थिंग कार्यक्षम ठेवा.
  • वीजवाहिनीखाली बांधकाम करू नका.
  • विद्युत उपकरणांची तपासणी दुरुस्ती परवानाधारक व्य़क्तिकडुनच करावी.
  • घरामध्ये योग्य़ क्षमतेच्या लिकेज सर्किट ब्रेकर (.एल.सि.बी.) वा मिनिॲच्युअर सर्किट ब्रेकर (एम.सी.बी.) चा वापर करावा.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य़ अभियंता सुखदेव शेरकर यांनी सर्व वीज ग्राहकांना वीज सुरक्षिततेबाबत जागृत करण्याचे समस्त़ अधिकारी कर्मचारी यांना आवाहन केले. या कार्यक्रमास  मुख्य़ अभियंता सुखदेव शेरकर,  विद्युत निरिक्षक  मोहन बोध, सहा. विद्युत निरिक्षक  रविंद्र गिरी, अधिक्षक अभियंताओंकार बारापात्रे, अधिक्षक अभियंता सम्राट वाघमारे, कार्यकारी अभियंता शरद वानखेडे, कार्यकारी अभियंता ( प्रशा.). प्रविण चकोले, अति. कार्यकारी अभियंता आनंद जैन, सौ. आरती गुरमुळे व सौ. शलाका जाधव तसेच दोन्ही विभागाचे समस्त़ अधिकारी, कर्मचारी  तसेच विद्युत कंत्राटदार प्रामुख्याने उपस्थित होते.