39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ खासदार मेंढेनी घेतली वाराणसी पर्यटन विकासाची माहिती

खासदार मेंढेनी घेतली वाराणसी पर्यटन विकासाची माहिती

0
29

गोंदिया,दि.15ः-भंडारा गोंदिया मधील पर्यटन विकासासाठी आवश्यक प्रयत्नांचा एक अत्यावश्यक भाग म्हणून खासदार सुनील मेंढे ह्यांनी आज वाराणसी येथे विविध अधिकार्यांची भेट घेऊन इथल्या पर्यटन विकासाची माहीती करून घेतली. वाराणसीचे विभागीय आयुक्त दीपक अग्रवाल, भारत पर्यटन वाराणसी विभागाचे  सहायक निर्देशक अमित कुमार गुप्ता यांची भेट घेतली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी संसदीय कार्यालयाला भेट देऊन तिथल्या कामाची माहिती देखील घेतली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांच्या नेतृत्वाखाली वाराणसी चा पर्यटन विकास अत्यंत सुनियोजित पद्धतीने सुरू आहे. मागील वर्षभरात १ कोटी हुन अधिक विदेशी नागरिकांनी वाराणसीला भेट दिली आहे. वाराणसीच्या विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार वाराणसी येथील भाजीपाला आता विदेशात विकला जात आहे. तसेच वाराणसी मध्ये माशांची मोठ्याप्रमाणात  मागणी असून सध्या आंध्र प्रदेशातुन त्याची आयात केली जात आहे. भंडारा मधील तलावांची मत्स्य निर्मितीसाठी उपयोग करता येईल का ह्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार मेंढे म्हणाले.
दरम्यान भंडारा गोंदिया मध्ये पर्यटन विकसित करण्यासाठी वाराणसी भेटीत मिळालेली माहिती अत्यंत उपयुक्त असून त्याचा वापर करून भंडारा गोंदियात पर्यटन उद्योग भरभराटीस आणणार असल्याचे प्रतिपदान खासदार मेंढे यांनी याप्रसंगी केले.