33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय राष्ट्रवादीचे निमकर, राठी भाजपच्या वाटेवर

राष्ट्रवादीचे निमकर, राठी भाजपच्या वाटेवर

0
15

नागपूर दि.8: जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच मोठा हादरा बसणार आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सदानंद निमकर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन राठी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. दोन्ही नेत्यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इराण दौऱ्यावरून नागपुरात परतल्यावर ते प्रवेश होईल.

निमकर यांनी तब्बल आठ वर्षे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. प्रदेशवरही ते महत्त्वाच्या पदावर होते. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष व काही काळ अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नितीन राठी यांनीही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी पक्षस्थापनेपासून पक्षात काम केले आहे. निमकर हे माजी मंत्री अनिल देशणुख यांचे तर राठी हे माजी मंत्री रमेश बंग यांचे निकटवर्तीय मानले जातात. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन माजी मंत्र्यांच्या निकवर्तीयांनीच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाची चिंता वाढली आहे.

blank