34.2 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home मराठवाडा/खान्देश आसगीतुर्क केंद्रात मध्ये केंद्रास्तरीय क्रीडास्पर्धा उत्साहात

आसगीतुर्क केंद्रात मध्ये केंद्रास्तरीय क्रीडास्पर्धा उत्साहात

0
31

आसंगीतुर्क व पांढरेवाडी व मोटेवाडी शाळेचे दैदीप्यमान यश;केंद्रातील अठरा शाळांचा सहभाग

संख,दि.17ः-जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती जत यांनी प्राथमिक शाळेतील मुलांच्यासाठी आयोजित क्रीडा स्पर्धांतर्गत आसंगीतुर्क ता जत येथे केंंद्रस्तरीय क्रिडास्पर्धा जि.प.प्राथमिक केंद्र शाळा आसंगीतुर्क येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी लहान व मोठ्या गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत आसंगीतुर्क ,पांढरेवाडी,मोटेवाडी व धुळकवाडीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत अव्वल राहत दैदिप्यमान यश संपादन केले. केंद्र प्रमुख रामचंद्र राठोड व नामदेव पुजारी व आसंगीतुर्क येथिल सरपंच सुर्याबा शिंगाडे,तानाजी वाघे,डॉक्टर मारुती पवार,सिध्दू बसर्गी यांच्याहस्ते क्रीडास्पर्धेचे फीत कापून उदघाटन करण्यात आले.या स्पर्धेत केंद्रातील अठरा शाळेच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे लहान गट खो-खो मुले धुळकरवाडी प्रथम, मुली खो खो पांढरेवाडी,मोठया गटात मुलांमध्ये मोटेवाडी शाळेने प्रथम क्रमांक ,कबड्डी स्पर्धेत मुलींच्या मोठया गटात आसंगीतुर्क शाळेने आहे.खो खो मोठ्या गट मुली पांढरेवाडी, तर लहान गट कबड्डी मध्ये बाबरवस्ती मुले व मुली दोन्ही गटात द्वितीय क्रमांक पटकिवला .या सर्व विद्यार्थ्यांनी दर्जेदार खेळ करत यश मिळवले. तर वैयक्तिक धावणे-प्रकारात श्रावण केंगार, प्रविण कुलाळ यांनी बाजी मारली तर मुलीमध्ये विद्या मोटे व दुर्गा पांढरे या मूलीनी बाजी मारली तर लांबी उडी प्रकारात-रोहन घुमरे श्रावण केंगार तर मुलीमध्ये रोहिणी कांबळे व दिपाली मोटे या खेळाडू नी बाजी मारली.

यावेळी आदर्श केंद्रप्रमुख कार्याबद्दल रामचंद्र राठोड यांचे केंद्राच्या वतीने सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आले.तसेच शैक्षणिक व सामाजिक कार्याबदल नामदेव पुजारी यांचे गौरव करण्यात आले .तसेच क्रिडा शिक्षक म्हणून डोगरसिंग सुर्यवंशी तर क्रिडा समन्वय म्हणून मनोज खोकले यांचे गौरव करण्यात आले.तसेच जत तालुक्यातील पहिली आय एस ओ. मानाकंन प्राप्त झाल्या बदल बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे केंद्राच्या वतीने सन्मानचिन्ह व सावित्रीबाई फुले पुस्तक व नारळ, शाल देवून मुख्याध्यापक दिलीप वाघमारे व सर्व विद्यार्थ्यांचे केंद्र प्रमुख रामचंद्र राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रामचंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.नामदेव पुजारी यांनी विजेत्या विध्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी स्वखर्चाने मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशस्तीचिन्ह व मानपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. विशेष सहकार्य मनोजखोकले,गोंविद चव्हाण ,शिंगाडे सर यावेळी स्पर्धा यशस्वीतेसाठी मेंडके विलास,धनराज मेंढेकर,सचिन आठवले,अभिजित माळगोंडे सर,शिवाजी गायकवाड ,सुनिल साळवे,कोरे सर,अनिल पवार,कुपसे सर,ठोकळे देविदास,शिंदे सर,मुजावर सर,अहिरे सर,अंकलगी सर,जानकर सर, पुजारी सर,मोकाशी सर स्पर्धा आयोजित करण्यासाठी सहकार्य केले.