37.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home गुन्हेवार्ता बेकायदेशीर गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, कारवाईत 1 कोटींहून अधिक...

बेकायदेशीर गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, कारवाईत 1 कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

0
5
धुळे,दि.१९ः-बेकायदेशीर गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. कारवाईत 1 कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने गुजरात-धुळे महामार्गावर गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे. या कारवाईत भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस टँकर, एचपी कंपनीचा डिझेल टँकर, व्यावसायिक गॅस सिलिंडर तसेच इतर साहित्य असा 1 कोटी 55 लाख 95 हजार 114 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात 3 आरोपींना पकडण्यात आले आहे. ही कारवाई धुळे जिल्ह्यातील सुरत-धुळे महामार्गावरील करण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्य दक्षता पथकाने गॅस व डिझेल टँकरमधून इंधनाची चोरी करताना धाड टाकली आहे. या कारवाईत गुजरातहून जळगावकडे जाणारा एलपीजी गॅस टँकर, त्यातील 17.42 मेट्रिक टन एलपीजी गॅस, डिझेल टँकर, त्यातील 35 किलोलीटर डिझेल, तसेच बोलेरो पिकअप, छोटा ट्रक, 140 व्यावसायिक गॅस सिलिंडर, गॅस भरण्याचे साहित्य, वजनकाटे आणि ड्रममधील डिझेल साठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्य दक्षता पथकाने केली आहे. या पथकातील दीपेंद्र परुळेकर, अमोल बुरटे, पवन कुंबले, रवींद्र राठोड, राजेश सोरते, राहुल इंगळे, देवानंद इंगळे आणि राजीव भेले यांचा समावेश होता. राज्यातील बेकायदेशीर इंधन व गॅस चोरी विरोधात ही मोठी कारवाई केली आहे. या घटनेत संबंधित आरोपींविरुद्ध तपास सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास धुळे पोलिस करत आहे.