27.3 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home विदर्भ पंचशील धम्मयात्रेत खा.नवनीत राणा यांचे हस्ते प्रा.डॉ.नरेश इंगळे यांचा सत्कार

पंचशील धम्मयात्रेत खा.नवनीत राणा यांचे हस्ते प्रा.डॉ.नरेश इंगळे यांचा सत्कार

0
58

अंजनसिंगी,दि.17ः-.आनंदवाडी येथे आयोजित तीन दिवसीय पंचशील धम्मयात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि धम्म शिल्ड देऊन अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.पत्रकारिता सामाजिक,शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य (पी एच डी)पदवी प्राप्ती आणि यूजीसी निर्देशित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारा आयोजित राज्यस्तरीय पात्रता (सेट)परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे यांचा हा सत्कार करण्यात आला. बौद्ध संस्कृती प्रचार-प्रसार समिती तिवसाचे वतीने मिराबाई नारायण नागदेवते नगर आनंदवाडी येथे हा भरगच्च कार्यक्रम झाला आहे.प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्यासह एडवोकेट दिपक सरदार,युवा स्वाभिमानचे धीरज केने,संदेश मेश्राम,माजी नगर पंचायत च्या अध्यक्ष राजकन्या ताई मकेश्वर,नगरसेवक सौ. पखाले,नरेंद्र विघ्ने,भूषण यावले,दिवाकर भुरभुरे, धम्मयात्रा महोत्सव समितीचे सचिव दिलीप शापामोहन,माजी सरपंच अनिल स्थूल,विनोदचंद्र शापामोहन पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुरत दाहाट आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमाला हजारो अनुयायी आवर्जून उपस्थित होते.