24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ निष्काळजीपणाची किंमत नागरिकांच्या जीवावर!

निष्काळजीपणाची किंमत नागरिकांच्या जीवावर!

0
136
लाखनी – मानेगाव फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या अत्यंत निकृष्ट अवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निरपराध नागरिकांना आपल्या जीवाशी खेळावे लागत आहे.
आज पुन्हा याच ठिकाणी एक गंभीर अपघात घडला. यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी स्वतःचा ताफा थांबवून अपघातग्रस्त महिलेला तातडीने मदत केली, तिला सुरक्षितपणे रुग्णवाहिकेत दाखल करून उपचारासाठी रवाना केले.
लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मानवतेचे कर्तव्य पार पाडले, परंतु प्रश्न असा आहे की, अशा दुर्घटना वारंवार घडत राहणार का?
संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कंत्राटदार आणि प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन लाखनी–मानेगाव फाटा येथील रस्त्याची दुरुस्ती करावी. नागरिकांच्या जीवाशी होणारा हा खेळ त्वरित थांबवावा, हीच जनतेची तीव्र मागणी आहे.