26.9 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home विदर्भ 20 जानेवारीला ओबीसी जनगणनेसाठी भव्य धरणे आंदोलन

20 जानेवारीला ओबीसी जनगणनेसाठी भव्य धरणे आंदोलन

0
43
नागपूर,दि.17ः-ओबीसी समाज या देशाचा कणा असतांना शासन त्या समाजाच्या जनगणणेकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 20 जानेवारीला संविधान चौकात 12 ते 5 या वेळेत धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. 1931 ला ओबीसी संख्या 52% निश्चित केली आहे. त्या टक्केवारीला शासन मान्य न करता विविध आयोग बनवून ओबीसीच्या प्रगतीला बाधा आणण्याचे धोरण आखत आहे. या देशात जनावराची पशुपक्ष्यांची झाडाची आकडेवारी गोळा करण्यासाठी प्रयत्न करीत असताना मानवजाती समूहातील संविधानाने मान्य केलेल्या प्रवर्गाची जनगणना सरकार का करीत नाही? असा प्रश्न या मोठ्या समाजासमोर आहे, निवडणूक लढण्यासाठी ओबीसी प्रवर्ग मान्य आहे. पण या देशातील सरकार बद्दलविणारा समाज मात्र अपुऱ्या आकडेवारी मुळे शासन प्रशासनात मागे राहिलेला आहे. म्हणून शासनाने फाजील खर्च न करता 2021च्या जनगणनेत ओबीसी जनगणनेचा स्तंभ टाकण्याची सुधारणा करावी, अन्यथा होणाऱ्या जनगणनेत हा समाज असहकाराचे आंदोलन उभे करेल ह्या व्यतिरिक्त केंद्राच्या बजेट सेशन मध्ये देशव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे आव्हान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी  केले आहे.येत्या 20 जानेवारीच्या धरणे आंदोलनात 12 ते 5 या वेळात मोठ्यात मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे असे आव्हान महासंघाचे सहसचिव प्रा. शरद वानखेडे, शहराध्यक्ष प्रा. संजय पन्नास, कार्याध्यक्ष  शकील पटेल , महिला अध्यक्ष सुषमाताई भड, प्रदेशाध्यक्ष कल्पनाताई मानकर, एड. रेखा बाराहाते, वृंदाताई ठाकरे , एड.समिक्षा गणेश, नंदाताई देशमुख, गुणेश्वर आरेकर, राजेश रहाटे, अरुण वराडे, देवराव रडके, विद्यार्थी प्रमुख निलेश कोढे, रोशन कुंभलकर, मयुर वाघ, रोहित हरणे, सोनिया वैद्य, विनोद हजारे, उज्वला महल्ले, राम बोराडे, शुभम वाघमारे, प्रणय पांढरे, गणेश नाखले , रूपेश राऊत आदिंनी केले आहे.