39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home राजकीय आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे-आ.कोरेटे

आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे-आ.कोरेटे

0
28

गोंदिया,दि.22 : वर्षानुवर्षापासून आमगाव, देवरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व सर्वसामान्य लोकांच्या विविध समस्येला धरून वरिष्ठस्तरावर पाठपुरावा केला. निस्वार्थ सेवेची पावती म्हणून येथील लोकांनी आमदारकीच्या निवडणुकीत भरघोस मते देऊन विधानसभेत पाठविले. त्यामुळे खèया अर्थाने त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचे अधिकार मिळाले. अशाचप्रकारे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येत्या एप्रिल ते मे ‘हिन्यात होणाèया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी घ्यायची असेल आणि निवडणुकीत विजय व्हायचे असेल, तर त्यांनी आपआपल्या क्षेत्रातील लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करावे. या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन आमदार सहसराम कोरोटे यांनी केले.
गोंदिया येथे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने  आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. यावेळी आमदार सहसराम कोरोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव योगेंद्र भगत, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पी. जी. कटरे, अनिल गौतम, जिल्हा महासचिव रत्नदीप दहीवले, आमगावचे तालुकाध्यक्ष नटवरलाल गांधी, सालेकसाचे तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, तिरोडा तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, गोरेगावचे तालुकाध्यक्ष देवेंद्र रहांगडाले, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, आमगाव तालुका महिला अध्यक्ष उषा भेंडारकर,महिला सामाजिक कार्यकर्ते सिमा कोरोटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार सहसराम कोरोटे यांचा शाल, श्रीङ्कळ व पुष्पगुच्छ देउन जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव योगेंद्र भगत यांनी केले. जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती यांनी संचालन करून उपस्थितांचे आभार मानले.